शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महापालिकेत कागद खरेदीत भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 23:24 IST

महापालिकेत जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी कागद खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी निविदा मागितल्याने हा प्र्रकार समोर आला हे विशेष. निविदा बोलावल्यानंतर प्रमाणपत्रासाठी योग्य कागदाचा दर ४.७५ रुपये पुढे आला असून, स्थायी समितीने यास मंजुरी दिली. मात्र, आतापर्यंत जन्म-मृत्यू विभागातर्फे नियमित पुरवठादाराकडून ७.९५ रुपये दराने कागद खरेदी केला जात होता. याप्रकरणी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी तीव्र शब्दात अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

ठळक मुद्देजन्म-मृत्यू विभागातील प्रकार : स्थायी समिती अध्यक्षांनी केली कानउघाडणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेत जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी कागद खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी निविदा मागितल्याने हा प्र्रकार समोर आला हे विशेष. निविदा बोलावल्यानंतर प्रमाणपत्रासाठी योग्य कागदाचा दर ४.७५ रुपये पुढे आला असून, स्थायी समितीने यास मंजुरी दिली. मात्र, आतापर्यंत जन्म-मृत्यू विभागातर्फे नियमित पुरवठादाराकडून ७.९५ रुपये दराने कागद खरेदी केला जात होता. याप्रकरणी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी तीव्र शब्दात अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.मनपा स्थायी समितीची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत जन्म-मृत्यू विभागाने प्रमाणपत्रांसाठीच्या कागदासाठी बोलावण्यात आलेल्या निविदेपैकी गुरुकृपा प्रिंटर्स अ‍ॅन्ड स्टेशनर्स यांची ४.७५ रुपये प्रतिकागद दराची निविदा मंजूर करण्यात आली. मात्र, यापूर्वी विभागाकडून नियमित पुरवठादार एजन्सीकडून हाच कागद ७.९५ रुपये दराने खरेदी केला जात होता, असे कुकरेजा यांनी नमूद केले. निविदेतील दर आणि आतापर्यंत देण्यात येणाऱ्या दरात ३.२० रुपयांची तफावत बघता कागद खरेदीतही भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी वर्षाला ४० हजार कागदांची गरज असते. त्यामुळे यात वर्षाला जवळपास १ लाख २८ हजारांचा भ्रष्टाचार दिसून येत आहे. कुकरेजा यांनी याप्रकरणी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. मात्र, त्यांच्यावर कारवाई टाळली.अमृत योजनेंच्या कामासाठी कार्यादेशस्थायी समितीच्या बैठकीत अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यातील २७३ कोटींच्या कामाचे सहा भाग करण्यात आले होते. त्यापैकी तीन भागाच्या निविदा उघडण्याचे तसेच २५ तारखेपर्यंत दर निश्चित करून कार्यादेश देण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचे कुकरेजा यांनी नमूद केले. यातून ४४ जलकुंभ तसेच ४३.४८ कोटी खर्चाची मुख्य जलवाहिनी व ७१ कोटींचे वस्त्यांतील जलवाहिनीचे जाळे पसरविण्यात येणार आहे.जलकुंभ सुरू करण्याचे निर्देशनासुप्रने नारा, वांजरा, कळमना व चिचभवन येथे जलकुंभ बांधले. यापैकी नारा, चिचभवन व वांजरा येथील जलकुंभ ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्याचे निर्देश जलप्रदाय विभागाला देण्यात आले. याशिवाय एलईडी लाईट्स प्रकरण न्यायालयातून मोकळे झाले असून, आता पुन्हा हे लाईट्स लावण्याचे काम सुरू करण्याचेही निर्देश देण्यात आल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाCorruptionभ्रष्टाचार