शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारास कर्मचाऱ्यांचेच अभय

By admin | Updated: June 4, 2016 02:50 IST

जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी गुरुवारी सायंकाळी सिटी सर्व्हे क्रमांक २ मध्ये आकस्मिक पाहणी करीत येथील अनियमितता समोर आणल्याने येथील कर्मचारी दुखावले गेले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात उतरले कर्मचारी : सिटी सर्व्हेतील कामकाज दिवसभर ठेवले बंदनागपूर : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी गुरुवारी सायंकाळी सिटी सर्व्हे क्रमांक २ मध्ये आकस्मिक पाहणी करीत येथील अनियमितता समोर आणल्याने येथील कर्मचारी दुखावले गेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईच्या विरोधात सिटी सर्व्हेतील कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. शुक्रवारी या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करीत सेतू केंद्रातील भूमापन कक्ष बंद करण्याची मागणी केली. कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे सिटी सर्व्हेत सुरू असलेल्या भ्रष्टाचारास येथील कर्मचारी समर्थन किंवा त्यांना साथ तर देत नाहीत ना, अशी चर्चा होती. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आणि निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांनी गुरुवारी नगर भूमापन कार्यालय क्रमांक २ (सिटी सर्व्हे) येथे अचानक भेट देऊन पाहणी केली. सेतू केंद्रामार्फत आलेल्या सर्व अर्जांचा निपटारा करण्यात आल्याचा अहवाल विभाग प्रमुख ठाकरे यांच्यावतीने देण्यात आला होता. परंतु या पाहणीत १० टक्के प्रकरणाचांही निपटारा झालेला नसल्याची बाब उघडकीस आली. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. पैशासाठी प्रकरण प्रलंबित ठेवले जात असल्याची बाब उघडकीस आली. जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत दोषींवर कारवाई करण्याचा इशारा दिला. यामुळे कर्मचारी हादरले. दरम्यान शुक्रवारी कार्यालय उघडताच जिल्हाधिकारी कुर्वे यांनी नगर भूमापन कार्यालयातील सर्व कागदपत्र मागवून घेतले. दस्तऐवजांची तपासणी केल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले. हे संकेत मिळताच दुपारी १ वाजता नगर भूमापन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात काळी पट्टी बांधून विरोधात निदर्शने केली. संपूर्ण परिसरात फिरून आपला विरोध दर्शविला. निदर्शने करीत कर्मचारी सेतू कार्यालयात सुरू केलेले नगर भूमापन केंद्र बंद करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांतर्फे विशेष व्यवस्था नगर भूमापन संबंधातील कामांसाठी नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सेतू केंद्रात सिटी सर्व्हेसंबंधी कामासाठी विशेष केंद्र सुरू केले होते. येथे येणाऱ्या प्रकरणाचा निपटारा आठ दिवसात करण्याचे आदेश देण्यात आले होते. सामान्य नागरिकांसाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. परंतु या व्यवस्थेमुळे सिटी सर्व्हेतील कर्मचाऱ्यांच्या कमाईवर याचा परिणाम होऊ लागला होता. त्यामुळे याचा विरोध केला जात होता. भाजपातर्फे स्वागतजिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सिटी सर्व्हे विभागात केलेल्या कारवाईचे भाजपातर्फे स्वागत करण्यात आले आहे. मनपा सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी जिल्हाधिकारी कुर्वे यांचे अभिनंदन करीत आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या कारवाईविरोधात आंदोलन करण्याच्या घटनेचा निषेध करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली. अपमान केल्याचा आरोप दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना अपशब्द बोलून अपमान केल्याने निदर्शने केली जात असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते.