शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
6
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
7
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
8
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
9
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
10
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
11
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
12
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
13
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
14
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
15
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
16
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
17
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
18
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
19
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
20
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला

असाध्य आजार दुरुस्त करून दाखवा अन् २५ लाख रुपये मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 10:46 IST

असाध्य रोगींचे आजार सिद्ध मंत्राने संपूर्णपणे दुरुस्त करून दाखवा आणि २५ लाख रुपये मिळवा, असे जाहीर आव्हान ब्रह्मर्षी कुमार स्वामींना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिले.

ठळक मुद्देअंनिसचे ब्रह्मर्षी कुमार स्वामींना आव्हान पोलिसात केली तक्रार

ऑनलाईन लोकमतनागपूर : वर्तमानपत्रांमधून सर्व दु:ख, आजार व कष्ट समाप्त करण्याचा दावा करणाऱ्या ब्रह्मर्षी कुमार स्वामींना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आम्ही देत असलेल्या असाध्य रोगींचे आजार सिद्ध मंत्राने संपूर्णपणे दुरुस्त करून दाखवा आणि २५ लाख रुपये मिळवा, असे जाहीर आव्हान दिले. तसेच मानकापूर पोलिसात तक्रार देत कार्यवाहीची मागणी केली.तक्रारीत म्हटल्याप्रमाणे नागपूर येथे आयोजित १७-१८ रोजी दोन दिवसीय ब्रह्मर्षी कुमार स्वामींचा प्रभू कृपा अदभूत दु:ख निवारण महासमागम या नावाने कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती वर्तमानपत्रातील जाहिरातीत प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत सत्यामित्रानंद गिरीजी महाराज यांच्या नावाचा संदर्भ देत ‘ब्रह्मर्षी श्री कुमार स्वामीजींमध्ये साक्षात भगवान गणपतीच्या शक्तीचा वास आहे म्हणूनच त्यांच्या स्पर्शाने सर्व रोग नष्ट होतात’ असा चमत्कारिक दावा करण्यात आला आहे. वरील दावे व वृत्तपत्रातील जाहिरात ही ड्रग्ज अ‍ॅण्ड मॅजिक रेमेडीज अ‍ॅक्ट १९५४ या कायद्याचा तसेच मेडिकल प्रॅक्टीशनर अ‍ॅक्ट १९६१ महाराष्ट्र या कायद्याचा भंग करणारी असून, जनसामान्यांची दिशाभूल करीत त्यांना लुबाडणारी आहे. सदर स्वामीविरुद्ध इतर राज्यांत जनतेला ठगविण्याची उदाहरणे यू ट्यूबवर उपलब्ध आहेत. याबाबतीत चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे.तक्रार देण्यासाठी अ.भा.अंनिसचे राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख, पंकज वंजारे महाराष्ट्र राज्य संघटक अ.भा.अंनिस युवा शाखा, महिला शाखा राज्य संघटक छाया सावरकर, उत्तम सुळके, नागपूर युवा शाखा कार्याध्यक्ष निखिल मोटघरे, वर्धा युवा जिल्हा शाखा सहसंघटक सुमित उगेमुगे, समुद्रपूर युवा शाखा संघटक संजित ढोके यांच्यासह नागपूर युवा शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्ही रुग्णही पुरवितो; तुम्ही बरे करून दाखवाअ.भा. अंनिसने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, प्रकाशित जाहिरातीत विविध मान्यवरांचे नाव, छायाचित्रासह आणखी काही दावे करीत आपल्या व्यक्तिगत, कौटुंबिक ग्रहदोषाची बाधा, समस्येच्या समाधानाकरिता समागमस्थळी संपर्क करण्याची माहिती याच जाहिरातीमध्ये आहे. मंत्राने रोग व कष्ट समाप्त करण्याच्या दाव्यावर अ.भा. अंनिसने ब्रह्मर्षी कुमार स्वामींना आम्ही रोगी देतो, त्यांचे असाध्य आजार तुम्ही तुमच्यातील सिद्ध मंत्रांनी, स्पर्शांनी पूर्णपणे दुरुस्त करून द्या आणि २५ लाख रुपये मिळवा, असे जाहीर आव्हान दिले आहे.

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामी