शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

मोरभवनात होणार मनपाचे परिवहन भवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपा परिवहन विभागातर्फे स्वतंत्र ‘परिवहन भवन’ची निर्मिती करण्यात येणार आहे. सीताबर्डी परिसरातील मोरभवन एक्स्टेंशन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपा परिवहन विभागातर्फे स्वतंत्र ‘परिवहन भवन’ची निर्मिती करण्यात येणार आहे. सीताबर्डी परिसरातील मोरभवन एक्स्टेंशन येथील जागेवर मनपाचे शहर बस सेवा संचालन व व्यवस्थापनाकरिता ‘परिवहन भवन’ उभारण्यात येणार आहे. याकरिता १ कोटी ५० लाखांचे प्राकलन तयार करण्यात येणार आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे सन २०२१-२२ चा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी शुक्रवारी स्थायी समितीचे सभापती प्रकाश भोयर यांच्याकडे सोपविला. या वेळी त्यांनी उपरोक्त माहिती दिली. सन २०२१-२२ चा वार्षिक अर्थसंकल्प २४६.१८ कोटींचा अपेक्षित असून, २४६.१५ कोटी खर्चाचा राहील. शुक्रवारी मनपा मुख्यालयातील स्व. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात स्थायी समितीची सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. या वेळी परिवहन समिती सदस्यांच्या वतीने परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी सदर अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. या वेळी बैठकीत समिती सदस्य संजय बालपांडे, आयशा उईके, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, निगम सचिव डॉ. रंजना लाडे आदी उपस्थित होते.

भेलावे यांनी सांगितले की, सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त प्रवास करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाला जलद गतीने चालना मिळण्याकरिता मनपा परिवहन विभागातर्फे, ‘शहर परिवहन सुधारणा व्यय’ अंतर्गत मनपाच्या ११५ डिझेल बसेसला सीएनजी किट लावण्याकरिता स्थायी समितीकडून मनपा निधीत ६ कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे शहराच्या सिव्हिल लाइन्स व बर्डी भागात सीएनजी पंप व इलेक्ट्रिक बस चार्जिंग सेंटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

परिवहन सेवा बळकटीकरणासाठी मनपाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाकडून त्यांच्या निधी अंतर्गत १५ इलेक्ट्रिक बसेस शहर परिवहन सेवेकरिता परिवहन विभागाला चालविण्याकरिता मिळणार आहेत. आगामी वर्षात डिजिटल पेमेंट सिस्टिम ‘Phone Pe’ किंवा ‘Paytm’ द्वारे प्रवाशांना तिकीट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने व तिकीट विक्रीतील चोरीला आळा घालण्याच्या उद्देशाने डिजिटल पेमेंट सिस्टिम प्रवाशांकरिता उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

बॉक्स

भंगार बसेसचा वापर महिलांच्या शौचालयासाठी

‘स्वच्छ भारत योजने’अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर नागपूर शहरातील प्रमुख बसथांब्यांलगत ज्या भंगार बसेस वापरात नाहीत अशा जुन्या बसेसच्या माध्यमातून ई-टॉयलेटची निर्मिती करण्यात येणार आहे. हा प्रकल्प कोरोना महामारी प्रादुर्भावामुळे प्रलंबित होता. तो पुन्हा सुरू करून महिलांसाठी ‘ती-बस’ "Bio Bus Toilet" तयार करण्यात येईल. या बसकरिता शहर परिवहन सुधारणा व्यय या अंतर्गत रु. ३० लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे.

बॉक्स

कोविड काळातील सेवेचा उल्लेख

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे २३ मार्च २०२० ते २७ ऑक्टोबर २०२० पर्यंत शहर बस सेवा पूर्णत: बंद होती. मात्र या काळात शहर बसच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सेवेचा विशेष उल्लेख अर्थसंकल्पीय निवेदनात करण्यात आला. प्रति बस ऑपरेटर २० ब प्रमाणे तीन ऑपरेटर मिळून ६० बसेस या कोविड १९ या महामारीत अहोरात्र सेवेत कार्यरत होत्या. या ६० बसेस आजही कोविड १९ च्या रुग्ण सेवेकरिता कार्यरत असून सर्वसामान्य नागरिकांना लाभ झालेला आहे.

बॉक्स

४७८ बसेस कार्यान्वित केल्या जातील

परिवहन विभागातर्फे शहर बस प्रवाशांना आदर्श व कार्यक्षम बससेवा उपलब्ध करून देण्याचे दृष्टीने नियोजित धोरणानुसार सन २०२१-२२ या वर्षात ६७ स्टॅण्डर्ड बस, १७० डिझेल इंधन बसचे सी.एन.जी. बसमध्ये रूपांतरित होणाऱ्या स्टॅण्डर्ड बसेस, १५० मिडी बस, ४५ मिनी बस व ०६ इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणाऱ्या मिडी बस तसेच केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या (सबसिडी अनुदानासह) ४० इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणाऱ्या बसेस अशा एकंदरीत ४७८ बसेस कार्यान्वित करण्यात येणार आहेत.