शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या वैद्यकीय अधिकारी मोहोकर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोनअंतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली मोहोकर यांना मनपा आयुक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोनअंतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली मोहोकर यांना मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी निलंबित केले आहे. मोहोकर स्वत: खासगी रुग्णालय चालवीत असूनही १.५ लाख वेतन घेत होत्या. महिला व प्रसूती रोग विशेषज्ञ डॉ. मोहोकर यांच्या विरोधात महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यांना आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांना मनपा मुख्यालयात माहिती सादर करावी लागेल. मोहोकर यांच्या निलंबन आदेशामुळे मनपाच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

मनपातील अनेक डॉक्टर खासगी रुग्णालयात सेवा देतात. तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात डॉ. प्रवीण गंटावार चर्चेत होते. त्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मनपा सभागृहात सादर करण्यात आला होता. परंतु त्यांच्यावर अद्याप निलंबन कारवाई करण्यात आलेली नाही. कोविड कालावधीत जेव्हा मनपाला डॉक्टरांची गरज निर्माण झाली, तेव्हाही ते मनपात सेवा देत नव्हते. काही दिवसापूर्वी डॉ. चिलकर यांनी डॉ. गंटावार यांच्यासह रजेवर असलेल्या डॉक्टरांना नोटीस बजावली होती. मात्र याचा काही परिणाम झाला नाही. वास्तविक ते स्वत:च्या रुग्णालयात कार्यरत होते. सूत्रांच्या माहितीनुसार डॉ. मोहोकर व मनपा आयुक्त यांच्यात काही मुद्यावरून वाद झाला होता. मोहोकर गेल्या दशकापासून मनपा सेवेत आहेत. याशिवाय त्या म्यूर मेमोरियल, महाल येथील एका डायग्नोस्टिक सेंटर व स्वत:च्या खासगी रुग्णालयात सेवा देतात.