शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 23:53 IST

कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी गांधीनगर येथील मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय आता यापुढे ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर’ म्हणून कार्यान्वित असेल. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचाराकरिता येथे ऑक्सिजनसह ११० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी गांधीनगर येथील मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय आता यापुढे ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर’ म्हणून कार्यान्वित असेल. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचाराकरिता येथे ऑक्सिजनसह ११० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) या दोन्ही रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी व नव्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सहायक ठरत आहे.सध्या इंदिरा गांधी रुग्णालयात ८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांसह, आयुष मंत्रालयाचे १२ डॉक्टर आणि इतर वैद्यकीय चमू सेवा देत आहे. या रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. रुग्णांना आवश्यक त्या प्रकारच्या उत्तम भौतिक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. रुग्णालयातील दुसऱ्या व तिसऱ्या माळ्यावर ७ वॉर्डमध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे.महापौर संदीप जोशी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या पुढाकाराने पुढील काही दिवसात मनपाच्या इतरही रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी अशा प्रकारची सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या जवळच्या कोविड चाचणी केंद्रात जाउन चाचणी करून घ्यावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार करून घ्यावा, असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या