शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
5
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
6
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
7
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
8
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
10
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
11
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
12
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
13
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
18
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
19
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
20
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

‘श्वानदंश’ आकडेवारीत नागपूर मनपाचे ‘गोलमाल’; आकड्यांमध्ये १९ हजारांची तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 07:30 IST

Nagpur News एकीकडे भटक्या श्वानांमुळे नागरिक त्रस्त असताना मनपाकडून मात्र अनेक वर्षांपासून आकडेवारीचाच खेळ करण्यात येत आहे. २०१४ ते २०१८ या चार वर्षांत नागरिकांना झालेल्या श्वानदंशांबाबत मनपाकडूनच माहिती अधिकारांमध्ये वेगवेगळी माहिती देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२०१४ ते २०१८ मध्ये नेमके दंश किती ?

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एकीकडे भटक्या श्वानांमुळे नागरिक त्रस्त असताना मनपाकडून मात्र अनेक वर्षांपासून आकडेवारीचाच खेळ करण्यात येत आहे. २०१४ ते २०१८ या चार वर्षांत नागरिकांना झालेल्या श्वानदंशांबाबत मनपाकडूनच माहिती अधिकारांमध्ये वेगवेगळी माहिती देण्यात आली आहे. तीन माहिती अधिकारांतील आकड्यांमध्ये तफावत असून, हा आकडा तब्बल १९ हजारांहून अधिक आहे. त्यामुळे शहरातील नेमके किती श्वानदंश झाले व मनपाकडून जाणूनबुजून असा प्रकार करण्यात येत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘लोकमत’च्या हाती श्वानदंशासंदर्भात २०१७, २०१८ व २०२० ला मनपाने माहिती अधिकारांची प्रतच आहे. २०१७ मधील माहिती अधिकाराच्या आकडेवारीनुसार एप्रिल २०१४ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत नागपुरातील ४३ हजार ४२२ नागरिकांना श्वानांनी दंश केला होता. २०१८ मधील माहिती अधिकारातील याच कालावधीतील आकडेवारी आश्चर्यचकित करणारी आहे. त्या आकड्यांनुसार एप्रिल २०१४ ते जुलै २०१८ या कालावधीत श्वानदंश झालेल्या नागरिकांची आकडेवारी ही अवघी २३ हजार ९२२ इतकी होती. सप्टेंबर २०१७ नंतर जुलै २०१८ पर्यंत आकडेवारी वाढणे किंवा तेवढीच राहणे अपेक्षित होते. मात्र, मनपाच्या आकडेवारीत चक्क १९ हजार ५०० इतकी तफावत आणि तीदेखील घट दाखविण्यात आली. या माहिती अधिकारानुसार २०१७-१८ शहरात ५ हजार ५३९ नागरिकांना भटक्या श्वानांनी दंश केला. मात्र २०२० च्या एका माहिती अधिकाराच्या उत्तरात हीच संख्या ५ हजार ३८९ इतकी दाखविण्यात आली.

- मनपाकडून लपवाछपवी की कायद्याचे उल्लंघन ?

माहितीच्या अधिकारांतर्गत नेमकी व अचूक माहिती असणे अपेक्षित असते. मनपाच्या आरोग्य विभागाकडून एकाच कालावधीत संपूर्ण शहरात झालेल्या श्वानदंशाबाबत वेगवेगळी माहिती देण्यात येत असेल तर हा संभ्रम निर्माण करणारा प्रकार आहे.

- २०१७-२०१८ च्या माहितीतील तफावत

वर्ष २०१७ मध्ये दिलेली माहिती - २०१८ मध्ये दिलेली माहिती

२०१४-१५ - १०,६४३ -३,६९९

२०१५-१६ - १२,२०७ -४,३४०

२०१६-१७ - १४,१८४ -७,०२६

२०१७-१८ - ६,३८८ (सप्टेंबरपर्यंत) -५,५३९

- २०१८-१९ मधील माहितीतील तफावत

वर्ष - २०१८ मध्ये दिलेली माहिती - २०२० मध्ये दिलेली माहिती

२०१७-१८ - ५,५३९ - ५३८९

टॅग्स :dogकुत्रा