शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

करवसुलीसाठी मनपाचा ‘ढोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:44 IST

तिजोरी रिकामी असल्याने महापालिकेचे बजेट बिघडले आहे. त्यातच मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीचा आकडा ४५२ कोटींवर पोहोचला आहे.

२० मोठ्या थकबाकीदारांच्या घरासमोर करणार ‘गांधीगिरी’ : ८ आॅगस्टला मालमत्ताही जप्त करणार लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तिजोरी रिकामी असल्याने महापालिकेचे बजेट बिघडले आहे. त्यातच मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीचा आकडा ४५२ कोटींवर पोहोचला आहे. विकास कामांचा ढोल वाजवताना येत्या निवडणुकांना पुढे जाण्यासाठी शहरात प्रत्यक्ष विकासाची गरज आहे. तिजोरीत पैसा आल्यावरच विकासाची गाडी सुपरफास्ट धावेल हे सत्तापक्ष आणि प्रशासनाला माहिती आहे. त्यामुळे आता बड्या थकबाकीदारांकडून करवसूलीसाठी मनपा प्रशासनाने अनोखी ‘गांधीगिरी’ करण्यात येणार आहे. थकबाकीदारांचे कान टवकारावे यासाठी मनपा त्यांच्या घरापुढे ढोल वाजविणार आहे. करवसुलीसाठी १७ जुलै ते ८ आॅगस्ट दरम्यान मालमत्ता व पाणी कर अभय योजना राबविली जात आहे. या योजनेला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु आजवरचा अनुभव विचारात घेता काही थकबाकीदारांकडून प्रतिसाद न मिळाल्यास ८ आॅगस्टला त्यांची मालमत्ता जप्त करून लिलाव करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी दहा झोनमधील २० मोठ्या थकबाकीदारांच्या घरापुढे वा व्यावसायिक प्रतिष्ठांनापुढे ढोल वाजवून त्यांना थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात येईल. झोन सभापती व जलप्रदाय समितीचे सभापती यांच्या नेतृत्वात ही ‘गांधीगिरी’करण्यात येणार असल्याची माहिती सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. मालमत्ता कराची व पाणीपट्टीची सर्वाधिक थकबाकी असलेल्या झोनमधील प्रत्येकी १० अशा २० बड्या थकबाकीदारांचा यात समावेश आहे. सभापतींच्या नेतृत्वात त्यांच्या घरापुढे ढोल वाजवला जाणार आहे. यावेळी लाऊ ड स्पिकरवरून थकबाकीदाराला थक बाकी भरण्याचे आवाहन करण्यात येईल. ढोल वाजविण्याचा कार्यक्रम एक तासाचा राहणार आहे. त्यानंतर थकबाकीदाराला गुलाबाचे फूल देण्यात येईल. यामुळे परिसरातील लोकांना थकबाकीदारांची नावे कळतील. शहर विकासात थकबाकीदार आडकाठी आणत असल्याची जाणीव लोकांना व्हावी, हा यामागील हेतू असल्याचे जोशी यांनी सांगितले. यात शहरातील नामांकित मॉल, प्रतिष्ठित संस्था व व्यक्तींचा समावेश आहे. शासकीय कार्यालयांकडेही मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. यात वसुलीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. अनेक कार्यालयाकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. नासुप्र व काही अन्य संस्थांकडे असलेल्या थकबाकीचे बूक समायोजन करण्यात येणार आहे. एम्प्रेस मॉलवर सर्वाधिक थकबाकी आहे. जलप्रदाय समितीचे सभापती राजेश घोडपागे यांच्या नेतृत्वात एम्प्रेस मॉलपुढे ढोल वाजवला जाणार आहे. धनादेश न वटल्यास गुन्हा दाखलगेल्यावेळी थकबाकीदारांसाठी योजना राबविण्यात आली होती. यात काही थकबाकीदारांनी धनादेश दिले होते. परंतु यातील काही धनादेश अजूनही वटलेले नाही. अशा लोकांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कारवाई टाळण्यासाठी त्यांना ८ आॅगस्टपर्यंत रक्कम भरण्याची संधी आहे. देयकाची प्रतीक्षा करू नकामालमत्ता कर दरवर्षी सारखाच असतो. त्यामुळे मालमत्ताधारकांना देयक मिळालेले नसेल तरी त्यांनी आजवर आकारण्यात येत असलेल्या क राइतकीच रक्कम त्यांना भरावयाची आहे. त्यामुळे करदात्यांनी देयकाची प्रतीक्षा न करता कर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मालमत्तांचा लिलाव करणारदहा झोनमधील मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. महापालिकेचे उपायुक्त रवींद्र देवतळे यांच्या नेतृत्वात थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अभय योजनेच्या कालावधीत थकबाकीदारांनी थकबाकी न भरल्यास त्यांच्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. यासाठी मालमत्ता व पाणीपट्टीची सर्वाधिक थकबाकी असलेल्या २० जणांचा यात समावेश असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.पहिल्याच दिवशी १.१६ कोटींची वसुलीअभय योजनेला सोमवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सर्व झोनमधील ११०८ मालमत्ताधारकांनी ७६ लाख १२ हजार रुपयांची थकबाकी भरली. पाणीपट्टी थकीत असलेल्या १२०२ ग्राहकांनी ४०लाख २४ हजार ४१८ रुपयांची थकबाकी भरली. अशी एकूण १ कोटी १६ लाख ५२ हजारांची वसुली झाली.