शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मनपा नि:शुल्क करणार शिक्षकांची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:27 IST

नागपूर : नागपूर शहरात इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी पर्यंत ५९३ शाळा आहेत. या शाळेचे ६२५२ ...

नागपूर : नागपूर शहरात इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी पर्यंत ५९३ शाळा आहेत. या शाळेचे ६२५२ शिक्षकांची आर.टी.पी.सी.आर चाचणी (कोरोना चाचणी) मनपाच्या ५० कोव्हीड चाचणी केन्द्रात आणि सहा वॉक इन सेंटर मध्ये नि:शुल्क केली जाईल, असे मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले.

शिक्षण विभाग मनपा, शिक्षण विभाग जिल्हापरिषद व शिक्षण उपसंचालकांच्या प्रतिनिधींची शुक्रवारी आढावा बैठक झाली. राज्य सरकारने २३ नोव्हेंबर पासून ९ वी ते १२ वी पर्यंतची माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याचे आदेश निर्गमित केले आहे. नागपूर शहरातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी सासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शाळा सुरु कराव्या, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

बैठकीत अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त व उपसंचालक (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. प्रदीप दासरवार, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, जिल्हापरिषदेचे माध्यमिक शाळेचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, शिक्षण उपसंचालकचे प्रतिनिधी श्रीराम चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार उपस्थित होते. सर्व खाजगी खाळांचे मुख्याध्यापकांशी वीडियो कान्फ्रेसिंगच्या माध्यमाने चर्चा करुन शासनाचे शाळा उघडण्यासंबंधीचे निर्देश देण्यात आले.

आतापर्यंत नागपूर शहरातील खाजगी शाळातील ३० टक्के शिक्षकांनी कोव्हीड चाचणी करुन घेतली आहे आणि उर्वरीत शिक्षकांना लवकरात लवकर चाचणी करुन घेण्याचे निर्देश दिले आहे. वंजारी यांनी सांगितले की दहावी आणि बारावीच्या पूरक परीक्षा सध्या सुरु झाल्या आहेत. तरी दहावीच्या ७ शाळा आणि १२ वी चे ७ कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा संपल्यानंतर सुरु होतील. नागपूरात ५९३ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जवळपास १,३२,००० विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषय शिकवीले जातील.

अशा आहेत सूचना

- अतिरिक्त आयुक्त श्री. संजय निपाणे यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना शाळा सुरु करण्यापूर्वी पालकांचे सम्मतिपत्र घेण्याचे निर्देश दिले.

- महापालिकेच्या माध्यमातून शाळांना सर्व वैद्यकीय सुविधा देण्यात येतील.

- सर्व शाळांना थर्मामीटर, थर्मल गन, पल्स ऑक्सीमीटर, जंतुनाशक साबण इत्यादीची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- - वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराचे नियमानुसार करावी.

- स्वच्छतागृहात गर्दी होणार नाही, तसेच रोज निर्जंतुक करण्यात येतील, याची काळजी घ्यावी.

मास्क आवश्यक, थर्मल स्क्रिनिंग होणार

- विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे.

- सर्व शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांची रोज थर्मल स्क्रीनींग केली जाईल तसेच शाळेच्या आवारात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

- शाळेत चार पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र जमणार नाही तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या साहित्याची जसे मास्क, पाण्याची बॉटल, शालेय साहित्य याची अदलाबदल करु नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहे.

आजारी मुलांना शाळेत पाठवू नका

- शाळेत संशयित कोविड-१९ रुग्ण आढळल्यास त्याला इतरांपासून वेगळे ठेवावे व त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क करावा. पाल्य आजारी असेल तर पालकांनी त्याला शाळेत पाठवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. - पालकांनी विद्यार्थ्यांना स्वत:च्या वैयक्तिक वाहनाने शाळेत सोडण्याचीही सूचना देण्यात आली आहे.