शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा खासगी रुग्णालयांच्या मुजोरीवर दुसऱ्यांदा वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:07 IST

नागपूर : महानगरपालिकेने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष खासगी रुग्णालयांच्या मुजोरीवर दुसऱ्यांदा वार केला. कोरोना उपचारासाठी मनमानी बिल ...

नागपूर : महानगरपालिकेने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष खासगी रुग्णालयांच्या मुजोरीवर दुसऱ्यांदा वार केला. कोरोना उपचारासाठी मनमानी बिल आकारण्यात आल्यामुळे खासगी रुग्णालयांविरुद्ध महानगरपालिकेला ४५० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परंतु, खासगी रुग्णालये त्यासंदर्भात आवश्यक स्पष्टीकरण सादर करीत नाहीत, असे महानगरपालिकेने न्यायालयाला सांगितले. महानगरपालिकेने यापूर्वीही खासगी रुग्णालयांच्या मनमानीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले होते.

मनपाच्या आरोपांवर इंडियन मेडिकल असोसिएशनने प्रत्युत्तर सादर केले. खासगी रुग्णालये मनपाला आवश्यक असलेली माहिती सादर करण्यास तयार आहेत. परंतु, त्यांच्या काही अडचणी असून, मनपाने त्यांची बाजू समजून घ्यावी, असे असोसिएशनने सांगितले. त्यानंतर न्यायालयाने दोघांचीही बाजू लक्षात घेता या कठीणकाळात सर्वांनी एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवली पाहिजे, अशी समज दिली. तसेच मनपाने त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीच्या प्रती संबंधित खासगी रुग्णालयांना पुरवाव्या व तक्रारीच्या प्रती प्राप्त झाल्यानंतर खासगी रुग्णालयांनी त्यावर उत्तर सादर करावे, असे निर्देश दिले. या वादावर सामंजस्याने तोडगा काढावा. जे प्रश्न सुटणार नाही त्यावर न्यायालय निर्णय देईल, असेही यावेळी सांगण्यात आले. खासगी रुग्णालयांनी यापुढेही तक्रारीला उत्तर न दिल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी तंबीही न्यायालयाने दिली.

-------------

रेमडेसिविर वापराची माहिती अपडेट नाही

अनेक खासगी रुग्णालये वापरण्यात आलेल्या रेमडेसिविरची माहिती वेब पोर्टलवर अपडेट करीत नाही, अशी माहिती ॲड. एम. अनिलकुमार व ॲड. मितिषा कोटेचा यांनी न्यायालयाला दिली. तसेच, न्यायालय मित्र ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी यावरून अनेक खासगी रुग्णालयांना रेमडेसिविरची गरज नसल्याचे स्पष्ट होते याकडे लक्ष वेधले. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता राज्य सरकारला रेमडेसिविर वाटपासंदर्भात पुढील दिशा ठरण्याचा आदेश दिला.

------------

इतर महत्त्वपूर्ण मुद्दे व निर्देश

१ - जिल्ह्यातील आणखी पाच खासगी कंपन्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला सीएसआर निधीतून ८२ लाख रुपये दिले. एनटीपीसी मौदा कंपनीने तीन कोटी रुपये जमा केले.

२ - महापारेषण कंपनीने दोन कोटी रुपये देण्यास मंजुरी दिली आहे. ही रक्कम एनटीपीसी कंपनीच्या धर्तीवर अदा करावी, असे न्यायालयाने सांगितले.

३ - चंद्रपूर जिल्ह्यातील २२ उद्योगांकडे सहा कोटी ५१ लाख रुपये सीएसआर निधी अखर्चित आहे. ही रक्कम मिळवण्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले याची माहिती चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यात आली.

४ - अमरावती विभागातील उद्योग सीएसआर निधीतून ६८ लाख रुपये देणार आहेत असे सरकारी वकील ॲड. केतकी जोशी यांनी सांगितले.

५ - चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणाकरिता हातात घेतलेली कामे कधी पूर्ण होतील यावर चार आठवड्यात उत्तर सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले.

६ - अकोला येथील ऑक्सिजन प्रकल्पाचे काम कुठपर्यंत आले याची माहिती अमरावती विभागीय आयुक्तांना मागण्यात आली.

७ - लता मंगेशकर रुग्णालय स्वखर्चाने ऑक्सिजन प्रकल्प उभारणार असल्याने, येथे सरकारद्वारे प्रस्तावित ऑक्सिजन प्रकल्प ग्रामीण भागात उभारण्यात यावा, असे न्यायालयाने सांगितले.