शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

मनपा कार्यालयाला नगरसेवकांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 21:29 IST

आधीच खेळाडूंना खेळण्यासाठी मैदाने अथवा हॉल नाही. अशात मनपाने हनुमाननगर येथे तयार केलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये हनुमाननगर झोनचे कर संकलन कार्यालय सुरू केल्याने संतप्त नगरसेवकांनी आत कर्मचारी असतानाच मंगळवारी या कार्यालयाला कुलूप ठोकले.

ठळक मुद्दे- तर २ जुलैला नगरसेवकांसोबत महापौरांचेही उपोषणकर संकलन कार्यालय बॅडमिंटन हॉलमध्ये हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधीच खेळाडूंना खेळण्यासाठी मैदाने अथवा हॉल नाही. अशात मनपाने हनुमाननगर येथे तयार केलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये हनुमाननगर झोनचे कर संकलन कार्यालय सुरू केल्याने संतप्त नगरसेवकांनी आत कर्मचारी असतानाच मंगळवारी या कार्यालयाला कुलूप ठोकले. दरम्यान महापौर संदीप जोशी तेथे पोहचले व त्यांनी सायंकाळी ५ पर्यंत हॉल रिकामा करण्याचे निर्देश दिले. तसे झाले नाही तर २ जुलै रोजी नगरसेवकांसोबत आपणही हॉलसमोर उपोषणाला बसणार, असा अल्टीमेटम दिला.नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, उषा पॅलट, शीतल कामडे यांच्यासह परिसरातील नागरिक हनुमाननगर बॅडमिंटन हॉल येथे पोहचले व आंदोलन करून कुलूप ठोकले. हनुमाननगर झोनचे कर संकलन कार्यालय चंदननगर येथील शाळेत होते. ती इमारत जीर्ण झाल्याकारणाने प्रशासनाने ते कार्यालय हनुमाननगरच्या बॅडमिंटन हॉलमध्ये हलविले. या बॅडमिंटन हॉलचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले असून, पुढील काही दिवसातच त्याचे लोकार्पण करण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच मनपा प्रशासनाने कर संकलन कार्यालय तेथे स्थानांतरित केले.संदीप जोशी यांना याबाबत माहिती मिळताच ते तेथे पोहोचले, सोबत उपमहापौर मनीषा कोठे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा होते. एकीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरात खेळाची मैदाने, विविध खेळांसाठी आवश्यक असलेले हॉल आदी साधने उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात असताना प्रशासकीय कार्यासाठी हॉल बळकावणे, हे मनपा प्रशासनाला शोभणारे नाही, या शब्दात महापौरांनी आपली नाराजी व्यक्त केली.सहायक आयुक्तांना ‘कारणे दाखवा’नोटीसआंदोलनावर तोडगा काढण्यासाठी संदीप जोशी स्वत: तेथे पोहचले असतानाही हनुमाननगरच्या सहायक आयुक्त सुषमा मांडगे यांनी मुख्यालयात बैठकीचे कारण सांगून तेथे येण्यास असमर्थता दर्शविली. याची गंभीर दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाMayorमहापौर