शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

निगम यांनी पदभार स्वीकारला

By admin | Updated: October 3, 2015 03:05 IST

राज्याचे नवे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) ए. के. निगम यांनी बुधवारी पदभार स्वीकारला

नवे वनबल प्रमुख : सक्सेना यांना निरोप नागपूर : राज्याचे नवे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) ए. के. निगम यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. त्यांनी मावळते वनबल प्रमुख अनिलकुमार सक्सेना यांच्याकडून वन विभागाची सूत्रे हाती घेतली. यानिमित्त वन भवन येथील टकले सभागृहात सायंकाळी एक छोटेखानी समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात निगम यांच्या हस्ते सेवानिवृत्त वनबल प्रमुख सक्सेना यांच्यासह सेवानिवृत्त विभागीय अधिकारी जाधव व मुख्य लेखापाल केंडे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सक्सेना यांनी मनोगत व्यक्त करताना वन विभागात काम करताना जीवनात काम कसे केल्या जाते, हे मला येथील कामाने शिकविले, असे सांगितले. शिवाय वन विभागातील ३७ वर्षांच्या सेवेतून खूप काही शिकायला मिळाले, असेही ते म्हमाले.नवनियुक्त वनबल प्रमुख ए. के. निगम यांनी अध्यक्षीय भाषणातून नवीन जबाबदारी स्वीकारताना वन विभागाचे काम यशस्वी करण्यासाठी कटिबद्घ राहील, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. एस. के. सिन्हा, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक मुंडे व प्रधान मुख्य वनसंरक्षक भगवान उपस्थित होते. संचालन शेंडे यांनी केले. राऊत यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)