शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus in Nagpur : दिल्लीतील मरकजहून परतलेला संशयित नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 20:27 IST

दिल्लीमधील निजामुद्दीन येथील मरकजवरून नागपुरात परतलेल्या सुमारे आठ व्यक्तींपैकी एका संशयिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देखासगी रुग्णालयात सुरू होते उपचार : प्रवासात सोबत आले होते आठ जण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्लीमधील निजामुद्दीन येथील मरकजवरून नागपुरात परतलेल्या सुमारे आठ व्यक्तींपैकी एका संशयिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मेडिकलमध्ये या संशयित व्यक्तीचे कोरोना (कोविड-१९) असे निदान झाले आहे. वैद्यकीय अहवालाची आता प्रतीक्षा आहे. सोमवारी दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरातील २०० व्यक्तींमध्ये कोरोना संक्रमणाची लक्षणे आढळल्याने देशभर खळबळ उडाली होती. हे सर्वजण निजामुद्दीन येथील मरकजमध्ये एकत्रित होते, हे उल्लेखनीय.दिल्लीमधील हे प्रकरण पुढे आल्यावर ‘लोकमत’ने अधिक माहिती घेतली असता, १० मार्चला सुमारे ८ व्यक्ती दिल्ली मरकज येथून नागपुरात परतल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, या परतणाऱ्यांमधील एकाला युरिनल इन्फेक्शन झाल्याने धंतोली येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र अनेक दिवस उपचार करूनही आराम न मिळाल्याने डॉक्टरांनी त्याला ३० मार्चला मेडिकलमध्ये रेफर केले. तिथे या संश्यिताची कोरोना चाचणी करण्यात आली.दिल्लीमधील या घटनेनंतर ‘लोकमत’ने नागपुरातील मरकजशी संबंधित जबाबदार व्यक्तींसोबत संपर्क साधला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संशयित व्यक्तीसोबत नागपुरात परतलेले सर्वजण स्थानिक रहिवासी आहेत.ते सर्व जण ६ मार्चला एका मजलिससाठी दिल्लीमधील मरकजला गेले होते.कोणत्याही सामान्य आजाराची लक्षणे दिसल्यावर कोरोनाची तपासणी होणे अनिवार्य आहे. सोमवारी दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीची तपासणी करण्यात आली आहे. अहवाल यायचा आहे. डॉ. मो. फैसल, जीएमसी, नागपूरनागपूर मरकजने यापूर्वीच केले क्वारंटाईनदिल्लीमधील निजामुद्दीन परिसरातील घटना उजेडात येताच नागपुरातही खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर नागपूर मरकजने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. येथे आलेल्या सर्वांची माहिती लॉकडाऊन होताच प्रशासनाकडे सादर करण्यात आली. त्यानंतर सर्र्वांना क्वारंटाईन करण्यात आले. हे सर्व जण लोग मशिदीत, मरकजमध्ये आणि काही आपल्या घरात सुरक्षित आहेत.नागपूर मरकजचे हाजी अब्दुल बारी पटेल यांच्या मते, परतणाऱ्यांमध्ये एकूण ५४ जणांचा समावेश आहे. यातील आठ जण विदेशी (बर्मा) येथील असून, ४६ जण भारतामधील वेगवेळ्या भागातून आलेले आहेत. लॉकडाऊन होताच सर्वांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे निर्देश देऊन वेगवेगळ्या मशिदींमध्ये तसेच घरांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. यातील पाच जणांना नागपूर मरकजमध्ये ठेवण्यात आले आहे. प्रशासनालाही यासंदर्भात आधीच कळविण्यात आले आहे. पोलीस प्रशासनासोबत चर्चा करून त्यांना परत पाठविण्याची परवानगी मागितली जात आहे. ती मिळाल्यास या सर्वांना त्यांच्या गावात आणि देशात पाठविले जाईल. दिल्लीमधील मरकजसारखेच नागपुरातील मरकजमध्येही देशभरातील नागरिक येत असतात, हे विशेष!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय