शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus  in Nagpur : मेडिकल, एम्समध्ये लवकरच कोरोनाचे निदान : यंत्रसामग्री उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 00:27 IST

कोरोना विषाणू संशयित रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल लवकर मिळण्यासाठी मेडिकल व ‘एम्स’मध्ये ‘पॉलिमर चेन रिअ‍ॅक्शन’ (पीसीआर) यंत्र उपलब्ध झाले आहे. कोरोनाची किट व ‘एनआयव्ही’कडून हिरवी झेंडी मिळाल्यास या आठवड्यात या दोन्ही रुग्णालयांच्या प्रयोगशाळेत कोरोनाची चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअहवालाची सहा ते बारा तासांची प्रतीक्षा होईल कमी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणू संशयित रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल लवकर मिळण्यासाठी मेडिकल व ‘एम्स’मध्ये ‘पॉलिमर चेन रिअ‍ॅक्शन’ (पीसीआर) यंत्र उपलब्ध झाले आहे. कोरोनाची किट व ‘एनआयव्ही’कडून हिरवी झेंडी मिळाल्यास या आठवड्यात या दोन्ही रुग्णालयांच्या प्रयोगशाळेत कोरोनाची चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, नमुने घेतलेल्या संशयित रुग्णांंना सहा ते १२ तास रुग्णालयात थांबण्याची वेळ कमी होईल. राज्यात कोरोनाचा शिरकाव होताच इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेला (व्हीआरडीएल) कोरोनाची चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली. या प्रयोगशाळेमध्ये केवळ विदर्भच नाहीतर छत्तीसगड व मध्य प्रदेशातून कोरोना संशयितांचे नमुने येतात. अलीकडे नमुन्यांची संख्या वाढली आहे. यामुळे तीन पाळींमध्ये प्रयोगशाळा सुरू ठेवली जात आहे. आतापर्यंत ७३० नमुने तपासण्यात आले आहे. परंतु नमुन्यांची वाढती संख्या व अहवाल मिळण्यास होत असलेल्या उशिरामुळे रुग्णांवर उपचार करण्यासही उशीर होत आहे. विशेष म्हणजे, नमुने घेतलेल्या संशयित रुग्णाला अहवाल येईपर्यंत रुग्णालयातच सहा ते १२ तास थांबण्याची वेळ येते. नमुने वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने मेडिकल व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) कोरोना विषाणूची चाचणी करण्याची तयारी करण्याच्या सूचना केल्या होत्या. या दोन्ही रुग्णालयांनीही स्वत:हून पुढाकारही घेतला होता. यामुळे नुकतेच दोन्ही रुग्णालयांच्या प्रयोगशाळेला ‘पीसीआर’ यंत्र उपलब्ध झाले आहे. यांच्या प्रयोगशाळाही सज्ज असून तपासणीसाठी लागणारी किट व पुण्याच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’च्या (एनआयव्ही) मंजुरीची प्रतिक्षा आहे. 

या आठवड्यात चाचणी सुरू करण्याचा प्रयत्न‘एम्स’च्या मायक्रोबायोलॉजी विभागात पीसीआर यंत्र उपलब्ध झाले आहे. ‘एनआयव्ही’कडून प्रयोगशाळेच्या जागेची पाहणी करून त्यांची मंजुरीही मिळाली आहे. आता केवळ चाचणीसाठी लागणाऱ्या किट्सची प्रतीक्षा आहे. त्या उपलब्ध झाल्यास या आठवड्यात कोरोनाची चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे.-डॉ. विभा दत्ता, संचालक, एम्स

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय