शहरं
Join us  
Trending Stories
1
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
2
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
3
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
4
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
5
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
6
Stock Markets Today: वीकली एक्सपायरीवर तेजीसह उघडला बाजार; सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला, IT, मेटल शेअर्समध्ये खरेदी
7
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
8
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
9
भारताची पाकिस्तानवर आणखी एक कारवाई; सेलिब्रिटींबाबत घेतला 'असा' निर्णय!
10
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
11
"अभिनेत्यांना सकाळी डाएट फुड अन् रात्री ड्रग्स हवे", पहलाज निहलानींचा खुलासा; अक्षयबद्दल म्हणाले...
12
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
13
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
14
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
15
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
16
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
17
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
18
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
19
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
20
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही

 Coronavirus in Nagpur; नागपुरातील हिंगणा एमआयडीसीतील ७० टक्के; कामगारांचे अद्याप लसीकरण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 08:00 IST

Nagpur News Vaccination राज्य शासनाने १ मार्चपासून लसीकरण मोहीम सुरू केली; पण हिंगणा एमआयडीसीतील ७० टक्के कामगारांनी अद्यापही लस मिळाली नाही. १० ते १५ टक्के कामगारांनी स्वत:च्या भरवशावर लस घेतली आहे.

ठळक मुद्दे १० ते १५ टक्के कामगारांनी स्वत:च्या भरोशावर घेतली लसलसीकरण मोहीम सुरू करणार

उदय अंधारे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : राज्य शासनाने १ मार्चपासून लसीकरण मोहीम सुरू केली; पण हिंगणा एमआयडीसीतील ७० टक्के कामगारांनी अद्यापही लस मिळाली नाही. १० ते १५ टक्के कामगारांनी स्वत:च्या भरवशावर लस घेतली आहे. एमआयडीत मे महिन्यात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून प्रतिसाद मिळत आहे.

पहिल्या टप्प्यात ४५ वर्षांवरील कामगार लस घेण्यासाठी पात्र होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ७० टक्के कामगारांना लस मिळाली नाही. एमआयडीसीत १८ ते ४५ वयोगटातील कामगार जास्त आहे. मे महिन्यात सुरू झालेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात हे कामगार पात्र ठरले आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे कामगारांच्या मनात अनेक शंका आहेत. शिवाय कामगारांमध्ये लसीकरण मोहिमेला कमी प्रतिसाद मिळण्याचे एक कारण म्हणजे लसींची कमतरता होय.

बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (बीएमए) माजी अध्यक्ष नितीन लोणकर म्हणाले, असोसिएशनने एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बुटीबोरीच्या सर्व कारखान्यांमध्ये कार्यरत कामगारांसाठी लसीकरण मोहीम आयोजित केली. कामगारांकडून मिळालेला अल्प प्रतिसादामुळे बुटीबोरी एमआयडीसीमध्ये कार्यरत असलेल्या ३५ हजार कामगारांपैकी आतापर्यंत फक्त २००० कामगारांना लस देण्यात आली आहे. सुरुवातीला लसीकरण कार्यक्रम ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कामगारांसाठी होता; परंतु नंतरच्या टप्प्यात ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या सर्व कामगारांसाठी लसीकरण मोहीम उघडली गेली. असे असूनही या मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळाला नाही.

प्रतिसाद समाधानकारक नाही

एमआयडीसीतील पेंट उत्पादक कंपनीच्या संचालिका रीता लांजेवार म्हणाल्या, कामगारांमधील लसीकरण मोहिमेला मिळालेला प्रतिसाद समाधानकारक नाही; कारण अनेक कामगारांच्या कुटुंबात किमान एक व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आढळली. म्हणून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वत:साठी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी लसीकरण कार्यक्रम टाळावा लागला.

हिंगणा एमआयडीसीमध्ये लसीकरण मोहीम

एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे (एमआयए) अध्यक्ष चंद्रशेखर शेगांवकर म्हणाले, एमआयडीसी हिंगणामधील आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्के कामगारांनी त्यांच्या वैयक्तिक क्षमतेवर लस घेतली आहे. एमआयए मे महिन्यात एमआयडीसी भागात लसीकरण मोहीम सुरू करणार आहे. त्याचा संपूर्ण डाटा उद्योग सहसंचालकांना देण्यात आला आहे. तथापि, शासनाकडून कोणतेही विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली नसल्यामुळे हिंगणा एमआयडीसीमध्ये अद्याप लसीकरणाची मोहीम सुरू झालेली नाही. दरम्यान, एमआयए गेल्या एक महिन्यापासून कामगारांसाठी विनामूल्य अ‍ॅन्टिजेन चाचणी आयोजित करीत आहे. गंभीर स्वरूपाची प्रकरणे जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडे प्रवेशासाठी पाठविली आहेत.

शासनातर्फे लस मोफत

१०० पेक्षा जास्त कामगार असलेल्या कंपन्यांना त्यांच्या स्वत:च्या जागेवर कामगारांसाठी लसीकरण मोहिमेची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. लस जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मोफत पुरविण्यात येणार आहे. याशिवाय १०० पेक्षा कमी कामगार असलेल्या कंपन्यांमध्येही ही मोहीम राबविण्यात येणार आहे. एमआयडीसी हिंगणामध्ये कामगारांची एकूण संख्या सुमारे २५ हजार असून किमान ५० युनिटमध्ये १०० पेक्षा जास्त कामगार तर ७०० पेक्षा जास्त लहान युनिटमध्ये १०० पेक्षा कमी कामगार आहेत. काही मोठ्या कंपन्या आरोग्य मूलभूत सुविधांसाठी पैसे देण्यास पुढे आल्या आहेत.

लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळणार

४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील २० टक्के कामगार लसीकरणासाठी पात्र होते. आता सरकारने १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांसाठी लसीकरण सुरू केले आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. सध्या लसांची कमतरता असल्याने लसीकरण पुढे ढकलले पाहिजे. साठा पुन्हा आला की लसीकरण सुरू होईल.

- अशोक धर्माधिकारी, सहसंचालक, उद्योग संचालनालय.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस