शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : यवतमाळमध्ये आणखी एक पॉझिटिव्ह  : विदर्भात रुग्णाची संख्या १११

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 21:37 IST

सलग सहा दिवस नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या उच्चांक गाठत असताना बुधवारी नागपुरात एकाही रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला नाही. मात्र यवतमाळ जिल्ह्यात एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला. या रुग्णासह यवतमाळमध्ये रुग्णांची संख्या १३ तर विदर्भात १११ झाली आहे.

ठळक मुद्दे १२८ नमुने निगेटिव्ह

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सलग सहा दिवस नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या उच्चांक गाठत असताना बुधवारी नागपुरात एकाही रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला नाही. मात्र यवतमाळ जिल्ह्यात एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला. या रुग्णासह यवतमाळमध्ये रुग्णांची संख्या १३ तर विदर्भात १११ झाली आहे. यातील १४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) आज बुधवारी ९६ नमुने तपासले. अमरावती जिल्ह्यातील ५४ तर यवतमाळ जिल्ह्यातील ४२ नमुने होते. यात यवतमाळ जिल्ह्यातील ६६ वर्षीय पुरुषाचा नमुना पॉझिटिव्ह आला. उर्वरित ९५ नमुने निगेटिव्ह आले. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत ३३ नमुने तपासण्यात आले. यात भंडारा जिल्ह्यातील १५, वर्धा जिल्ह्यातील १, चंद्रपूर जिल्ह्यातील ११ तर नागपुरातील ६ नमुने होते. हे सर्वच नमुने निगेटिव्ह आले. एकूण १२८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. नागपुरात आतापर्यंत ५६, गोंदियात १, अमरावतीमध्ये ५, बुलडाण्यात २१, अकोल्यात १४, यवतमाळमध्ये १३ तर वाशिममध्ये १, अशी विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या १११ झाली आहे. यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूरच्या मेडिकलला आज तपासणी किट उपलब्ध न झाल्याने प्रयोगशाळेतील कामकाज ठप्प होते. 

वर्धेत पकडलेल्या ट्रकमधील ४४ व्यक्तींचे नमुने निगेटिव्हकाही दिवसांपूर्वी वर्धेत एक ट्रक पोलिसांनी पकडला. हा ट्रक छत्तीसगडकडे जात होता. ट्रकमध्ये ४४ व्यक्ती लपून बसल्या होत्या. कोरोना संशयित म्हणून या व्यक्तींची नोंद करून यांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. मंगळवारी रात्री तपासण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल बुधवारी सकाळी प्राप्त झाला. सर्वच नमुने निगेटिव्ह आले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याYavatmalयवतमाळ