शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांच्या कोरोना लसीची नागपुरात ‘ट्रायल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला जात असून यात लहान मुले अधिक प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात ...

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला जात असून यात लहान मुले अधिक प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने मागील दोन महिन्यांपासून २ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांवरील कोरोना लसीच्या मानवी चाचणीला (ट्रायल) मंजुरीची प्रतीक्षा होती. अखेर भारतीय औषधी महानियंत्रकांनी (डीसीजीआय) ट्रायलला मंजुरी दिली असून ‘एम्स’ दिल्ली, ‘एम्स’ पाटना व नागपुरात वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्याकडे ही चाचणी होणार आहे.

कोरोनाचा पहिल्या लाटेत लहान मुले व कुमारवयीन मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण फारसे नव्हते; परंतु दुसऱ्या लाटेत १९ वर्षांपर्यंतच्या वयोगटात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून आले. जानेवारी महिन्यात नागपूर जिल्ह्यात ९०३, फेब्रुवारी महिन्यात १७४१, मार्च महिन्यात ६९६६ तर एप्रिल महिन्यात २०८१० असे एकूण चार महिन्यांत ३०,४२० मुले बाधित झाली. यातच कोरोना विषाणूचे होत असलले ‘म्युटेशन’ व लसीकरणापासून दूर असलेल्या मुलांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे योग्य पद्धतीने पालन होत नसल्याने तिसरी लाट धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दरम्यान भारत बायोटेक कंपनी २ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांवर ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या ‘ट्रायल’साठी प्रयत्नात होती. नागपुरातून डॉ. खळतकर यांनी चाचणीसाठी पुढाकार घेतला होता. मंगळवारी ‘डीसीजीआय’ने परवानगी दिल्याने लवकरच चाचणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

-कोव्हॅक्सिन लसीचा पहिला टप्पाही नागपुरातून

१८ वर्षांवरील ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा मानवी चाचणीचा पहिल्या टप्प्याला नागपुरातील गिल्लुरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधून सुरुवात झाली होती. दुसऱ्या टप्प्यात एका खासगी हॉस्पिटलमध्ये १५०० व्यक्तींवर याच लसीची चाचणी झाली. याशिवाय, ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चा ‘कोविशिल्ड’ लसीचा चाचणीचा तिसरा टप्पा मेडिकलमध्ये यशस्वी पार पडला. त्यानंतर आता लहान मुलांच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पाही नागपुरातून सुरू होत असल्याने नागपूरच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.

-तीन आठवड्यांनंतर प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात

‘डीसीजीआय’ने २ ते १२ वयोगटातील भारत बायोटेक कंपनीच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या मानवी चाचणीला मंजुरी दिली आहे. संबंधित कंपनीकडून यासंदर्भातील पत्र यायचे आहे. पत्र आल्यानंतर व ‘इथिकल’ समितीकडून परवानगी मिळाल्यानंतर साधारण तीन आठवड्यांत प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात होईल.

-डॉ. वसंत खळतकर, बालरोगतज्ज्ञ