शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना : नागपुरातील लक्ष्मीनगर व धरमपेठ भागातील १८,७०४ घरांचा सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 00:58 IST

नागपूर शहरात चार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, या चारही व्यक्ती धरमपेठ आणि लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या परिसरात राहणाऱ्या आहेत.या व्यक्ती विदेशातून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात कोण कोण आलेत, याचा शोध घेतला जात आहे.

ठळक मुद्देविदेशातून परतलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात चार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, या चारही व्यक्ती धरमपेठ आणि लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या परिसरात राहणाऱ्या आहेत. या व्यक्ती विदेशातून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात कोण कोण आलेत, याचा शोध घेतला जात आहे. अशा व्यक्तींशी मनपाच्या आरोग्य विभागाने संपर्क साधला असून, त्यांना 'होम क्वारंटाईन' करण्यात आले आहे. परंतु मागील काही दिवसात या व्यक्तींच्या संपर्कात अनेक जण आल्याची शक्यता विचारात घेता, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी धरमपेठ व लक्ष्मीनगर झोन परिसरात घरोघरी सर्व्हे करून माहिती संकलित करण्याचे आरोग्य विभागाला तातडीने निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवारपर्यंत १८ हजार ७०४ घरांचा सर्व्हे करण्यात आला.मनपाचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरमपेठ आणि लक्ष्मीनगर झोनमध्ये घरोघरी केलेल्या सर्व्हेमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या २२९ चमूंकडून तपासणी करण्यात आली. एका चमूमध्ये दोन व्यक्ती असून, ते घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत. कुणी विदेशातून आले आहे का, याचीही माहिती या सर्व्हेक्षणादरम्यान घेण्यात येत आहे. या सर्व्हेक्षणादरम्यान ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतील, त्यांना होम क्वारंटाईन केले जात आहे.उच्चभ्रूंकडून सर्व्हेला सहकार्य नाही‘कोरोना’चा प्रादुर्भाव शहरात वाढू नये म्हणून लक्ष्मीनगर व धरमपेठ झोन क्षेत्रात प्रत्येक घराचा सर्व्हे केला जात आहे. या सर्व्हेत घरोघरी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची माहिती घेऊन सतर्कता आणि खबरदारीच्या सूचनाही केल्या जात आहेत. मोहिमेत मनपाच्या मलेरिया, फायलेरिया व अन्य विभागातील ३५२ कर्मचाºयांचा समावेश आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व्हेक्षणाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. परंतु काही स्वत:ला उच्चभ्रू समजणारे या सर्व्हेतील कर्मचाºयांना अपेक्षित सहकार्य करीत नसल्याचे पुढे आले आहे. अशा लोकांपासून समाजाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पथकाला सहकार्य करण्याची गरज आहे.कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी पुढाकार घ्या!कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. साथीला वैद्यकीय क्षेत्रातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यानी यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र काम करीत आहे. काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. तरीही भविष्यात गंभीर परिस्थिती उद्भवली तर आरोग्य यंत्रणाही तोकडी पडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता यापूर्वी निमलष्करी दल, सैनिकी सेवा, शासकीय आरोग्य सेवा, मनपा आरोग्य सेवा आदी ठिकाणी सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, डीएमएलटी असलेले व्यक्ती आदींनी स्वत: पुढाकार घेऊन कोरोनाशी एकत्रितपणे लढा देण्यासाठी आरोग्य सेवा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सेवा देण्यास इच्छुक आहेत, त्यांनी मनपाचे सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांच्याशी ९८२२५६९२१३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका