शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

वैदर्भीयांचा अमेरिकेत ‘कोरोनासंहारक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 16:03 IST

अमेरिकेत यंदा मराठी बांधवांकडून श्रीगणेशोत्सव साजरा केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मंडळींनी यंदा तेथे ‘कोरोनासंहारक गणपती’ची स्थापना केली आहे.

ठळक मुद्देकाटेकोर नियमांसह राबविले जात आहेत विविध उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय आणि महाराष्ट्रातील नागरिक जगात जिथे-कुठे नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झाले तेथे त्यांनी आपल्याकडील संस्कृती, सोपस्कारही नेले. याचे सगळ्यात मोठे उदाहरण जर देता येईल तर ते श्रीगणेशोत्सवाचे. याच कारणाने जगभरात गणेशोत्सवाची धूम असते. अमेरिकेतही यंदा मराठी बांधवांकडून श्रीगणेशोत्सव साजरा केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मंडळींनी यंदा तेथे ‘कोरोनासंहारक गणपती’ची स्थापना केली आहे.

वैदर्भीय असलेल्या अनुप्रिया केंद्रे-कायंदे यांनी सांगितले, अमेरिकेत मोठ्या संख्येने मराठी समाज स्थायिक झालेला आहे. तेथील वेगवेगळ्या शहरात मराठी लोक जवळपास सगळेच सण मिळून-मिसळून करत असतात. येथीलच कनेक्टिकट येथील ‘देसीज अराऊण्ड रॉकी हिल’ या भारतीयांच्या समूहामार्फत २०१८ पासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. अमेरिकेत असूनही अगदी पारंपारिक पद्धतीने ढोल, ताशे, लेझीमच्या गजरात येथे गणरायाचे स्वागत केले जाते आणि अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव विधिवत साजरा केला जातो.

हे वर्ष कोरोनाने ग्रासले आहे. जगभरात या सूक्ष्म विषाणूचे थैमान आहे. या विषाणूच्या संसर्गाने सर्वत्र अजूनही धास्तीचेच वातावरण आहे. तरीदेखील गणेशभक्तांचा उत्साह कायम आहे. अमेरिकेतील हे मंडळही या उत्साहाला अपवाद नाही. न्यूइंगटन येथील वल्लभधाम मंदिराचे विश्वस्त राजीव देसाई यांच्या सहकार्यातून व मंडळाचे उपाध्यक्ष उपेंद्र अविनाश वाटवे यांच्या संकल्पनेतून यंदा ‘कोरोनासंहारक गणपती’ येथे बसवण्यात आला आहे. वाटवे यांनीच ही मूर्ती साकारली. हेमंत कडेगावकर यांनी रंगछटा दिली आणि कीर्ती व अमोल मोरे या दाम्पत्याने सजावट केली. स्थापना सोहळ्याचे यजमान विनय पाडोळे होते तर पौरोहित्य दुर्गेश जोशी यांनी केले.

गणेशभक्तांचा उत्साह कायम ठेवण्यासाठी कार्यकर्ते गौतम नाईक, अभिजित वग्गा, दीपा कृष्णमूर्ती, वेदा कडेगावकर यांनी ऑनलाईन निबंध स्पर्धा, गणपती सजावट स्पर्धा, गणपती कला प्रदर्शन, अथर्वशीर्ष पठण आदी उपक्रम राबविले आहेत. विशेष म्हणजे ही सर्व मंडळी महाराष्ट्रासह विदर्भातील आहेत.

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव