शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही : डॉक्टरांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:25 IST

‘लोकमत’ने या विषयी शहरातील वरिष्ठ तज्ज्ञांशी संवाद साधला असता त्यांनी कोरोनाला घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले. त्यांच्यानुसार, चीनच्या तुलनेत चीनच्या बाहेर याचा मृत्युदर ०.२ टक्के आहे. जर १ हजार रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाली तर ९९८ रुग्ण ठणठणीत बरे होत आहेत.

ठळक मुद्देमृत्युदर फारच कमी : योग्य उपचाराने रुग्ण बरा होतोलोकमत जागर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चीनमधील वुहान शहरातून पसरून ‘कोरोना व्हायरस’ने जगभरात दहशत निर्माण केली आहे. भारतासह आता नागपुरातही या विषाणूच्या रुग्णाचा शिरकाव झाला आहे. दिवसेंदिवस या रुग्णांत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच सोशल मीडियावर सुचविल्या जाणाऱ्या प्रतिबंधक उपायांमुळे गोंधळात भर पडली आहे.‘लोकमत’ने या विषयी शहरातील वरिष्ठ तज्ज्ञांशी संवाद साधला असता त्यांनी कोरोनाला घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले. त्यांच्यानुसार, चीनच्या तुलनेत चीनच्या बाहेर याचा मृत्युदर ०.२ टक्के आहे. जर १ हजार रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाली तर ९९८ रुग्ण ठणठणीत बरे होत आहेत. यामुळे नागपूरकरांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये.सर्वाधिक विषाणूंचा प्रादुर्भाव चीनमधून-डॉ. दंदे

डॉ. पिनाक दंदे म्हणाले, सर्वाधिक विषाणूंचा प्रादुर्भाव चीनमधूनच झाला. साधारण ७५ टक्के विषाणू पसरण्याचे स्थान चीन होते. तथे कमी शिजवलेले, कच्चे मांस खाण्याची प्रथा आहे. त्यामुळे प्राण्यांमधून या रोगाचा मानवामध्ये प्रादुर्भाव झाला. सध्या या विषाणूवर औषध नाही. रोग पसरण्याची गती फार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोणी नागरिक कोरोना रुग्णासोबत किंवा त्यांच्या सानिध्यातून आले असेल आणि त्यास लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे आवश्यक आहे. सर्वांनी मास्क घालणे आवश्यक नाही. मात्र ज्यांना खोकला, सर्दी आहे त्यांनी मास्क घालावे.स्वाईन फ्लूच्या तुलनेत कोरोनाचा मृत्युदर कमी-डॉ. अरबट

डॉ. अशोक अरबट म्हणाले, यापूर्वी २०१० ते २०१९ या वर्षात स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून आले. सुरुवातीला स्वाईन फ्लूचा मृत्युदर हा ११ ते १३ टक्के होता. म्हणजे १०० पैकी ११-१३ रुग्णांचा मृत्यू होत असे. आता स्वाईन फ्लूचा रुग्ण सहजतेने बरा होतो. महाराष्ट्रात दहा वर्षात स्वाईन फ्लूचे २२,८६० रुग्ण आढळले. त्यापपैकी ३,४४७ रुग्णांचा मृत्यू झाला. हे प्रमाण ११ टक्के आहे. या सगळ्यांची कोरोना व्हायरसच्या मृत्युदराशी तुलना केली तर कोरोनाचा मृत्युदर कमी आहे. दक्षिण चीनमधून उगम पावलेल्या ‘सार्स’चा मृत्युदर १० टक्के होता. तर ‘मिडल ईस्ट सिन्ड्रॉम’चा मृत्युदर ३४ टक्के होता. कोरोना व्हायरसचा मृत्युदर फार कमी आहे.कोरोना होऊनही ९८ टक्के लोक बरे होतात- डॉ. देशमुख

डॉ. जय देशमुख म्हणाले, आपल्या देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. या रोगाच्या तुलनेत, डेंग्यू, स्वाईन फ्लू, ‘हेपेटायटीस-बी’ हे रोग आपल्याकडे धोकादायक ठरले आहेत. अद्यापही ९५ टक्के व्हायरसवर औषधे नाहीत. व्हायरसमुळे होणाºया मृत्यूपेक्षा कोरोनाचा मृत्युदर कमी आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांपैकी शंभरातील २ किंवा ३ रुग्णांचा रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. कोरोना होऊनही साधारण ९८ टक्के रुग्ण बरे होतात. म्हणजेच, योग्य काळजी घेतली तर रुग्ण हमखास बरा होतो. प्रतिबंधात्मक उपाय करण्यास व सावधगिरी बाळगण्यास प्राधान्य दिले पाहिजे. आपणास कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालाय असे वाटले तर तत्काळ डॉक्टरांकडे जावे. जसजसे उन्ह वाढेल तसतसे या विषाणूच्या रुग्णांची संख्याही कमी होईल.दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहा - डॉ. तायडे

डॉ. परिमल तायडे म्हणाले, कोरोना विषाणूचा मृत्युदर निश्चितच इतर विषाणूंपेक्षा कमी आहे. यामुळे घाबरून जाऊ नका. परंतु सोशल मीडियावर या रोगाला घेऊन ज्या अफवा पसरविल्या जात आहेत, किंवा दिशाभूल केली जात आहे त्यापासून निश्चितच सावध राहायला हवे. या रोगावर प्रतिबंधात्मक औषधी किंवा ठराविक उपचार नाही. परंतु यांच्या लक्षणांवर करण्यात येणाºया औषधोपचाराने रुग्ण बरे होतात. आपल्याकडे एकेकाळी स्वाईन फ्लू खूप वाढला होता. त्याची भीती ‘कोरोना’मधून दिसून येणे हे साहजिकच आहे. मात्र, लोकांनी सावधगिरी बाळगली तर या रोगाला दूर ठेवणे सहज शक्य आहे. या ‘व्हायरस’विरुद्ध लढण्यासाठी नागपुरातील डॉक्टर सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.गर्दीच्या ठिकाणी रुमालाचा मास्क वापरा‘एन-९५’ मास्क हा रुग्ण व त्याच्या जवळच्या नातेवाईक व त्यांच्यावर उपचार करणाऱ्यांनीच वापरावा. ज्यांना गर्दीच्या ठिकाणी जावयाचे आहे अथवा आजारी आहेत त्यांनी रुमालास अथवा कापडास स्वच्छ धुऊन त्याचा मास्कसारखा वापर करावा. हाताचा नाक-तोंड-डोळे यांना थेट स्पर्श टाळला पाहिजे आणि मास्कमुळे हे टाळता येईल. सोबतच सॅनिटायजरचा वापर करावा अथवा साबणाने २० सेकंदांपर्यंत हात धुणे आवश्यक आहे.जागतिक साथीचे रोग                                       मृत्युदरमिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिन्ड्रॉम                             ३४ टक्केसिव्हियर अ‍ॅक्युट रेस्पि. सिन्ड्रॉम (सार्स)                १० टक्केस्वाईन फ्लू (भारत)                                              ७ ते ८ टक्केकोरोना व्हायरस                                                  २ ते ३ टक्के (चीनमध्ये)                                                                          ०.२ टक्के (चीनच्या बाहेर)-यांना धोका संभवतो...

  • रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे
  • रक्तदाब, मधुमेहादी रोगाचे रुग्ण
  • हृदयरोग, फुफ्फुसाच्या आजारांचे रुग्ण
  • लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक
  • अन्य आजारांनी ग्रसित व्यक्ती

-ही काळजी घ्यावी...

  • हस्तांदोलन करण्यापेक्षा नमस्कार करा
  • वारंवार तोंडाला हात लावू नका
  • लावायचे असल्यास स्वच्छ धुऊन लावा
  • मांस चांगले शिजवावे
  • सर्दी किंवा खोकला असेल तर मास्क किंवा रुमाल बांधावा
  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे
  • सोशल मीडियावरील माहितीपासून सावधान
टॅग्स :corona virusकोरोनाdoctorडॉक्टर