शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना विळखा होत आहे घट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:09 IST

- ४९८ नव्या रुग्णांची भर, ६ मृत्यू : मागील पाच दिवसात २,२५८ बाधितांची नोंद नागपूर : मागील दोन महिन्यात ...

- ४९८ नव्या रुग्णांची भर, ६ मृत्यू : मागील पाच दिवसात २,२५८ बाधितांची नोंद

नागपूर : मागील दोन महिन्यात कोरोनाचा सैल झालेला विळखा आता पुन्हा घट्ट होऊ लागला आहे. सोमवारी ४९८ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली तर ६ बाधितांचे मृत्यू झाले. रुग्णांची एकूण संख्या १,३९,२५३ झाली असून, मृतांची संख्या ४,२३३ वर पोहचली. विशेष म्हणजे, रुग्ण वाढत असताना संशयित रुग्णांच्या तपासणीचे प्रमाण कमी झाले आहे. आज २,६३५ चाचण्या झाल्या. पॉझिटिव्हीटीचे प्रमाण १८.८९ टक्के झाले आहे.

नागपूर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात दररोज २०० ते २५० दरम्यान बाधित आढळून येत होते. परंतु मागील आठवड्यापासून ४५० ते ५०० दरम्यान रुग्ण दिसून येत आहेत. या पाच दिवसात २,२५८ नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे आरोग्य यंत्रणेतच नाही तर सामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शाळा सुरू झाल्याने पालकांमध्ये काळजी वाढली आहे. आज २,११२ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. यातून ४६२ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर, ५२३ रॅपिड अँटिजेन चाचण्यांमधून ३६ बाधित आढळून आले. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये ४३९ शहरातील, ग्रामीणमधील ५७ तर जिल्हाबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ३, ग्रामीणमधील १ तर जिल्हाबाहेरील २ मृत्यू आहेत. आज २८१ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही घसरल्याने बरे होण्याचा दर आता ९३.९० वर आला आहे. सध्या ४,२६१ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील १३२० रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात तर २,९४१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.