शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

कोरोनाने दिला पुरेशा झोपेचा मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:07 IST

नागपूर : अपूर्ण किंवा कमी दर्जाच्या झोपेमुळे शारीरिक व मानसिक व्याधी जडतात़ जगात ४५ टक्के लोक झोपेशी जुळलेल्या ...

नागपूर : अपूर्ण किंवा कमी दर्जाच्या झोपेमुळे शारीरिक व मानसिक व्याधी जडतात़ जगात ४५ टक्के लोक झोपेशी जुळलेल्या रोगाशी सामना करीत आहेत. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात पुरेशी झोप न झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन कोरोना होण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढत असल्याचे समोर आले आहे. यामुळे आरोग्याला गंभीरतेने घेत असलेले नागरिक झोपेला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने पुरेशा व शांत झोपेसाठी प्रयत्नांना सुरुवात करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

-शांत झोपेचे महत्त्व जाणले()

नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बाधित रुग्ण म्हणून माझी ओळख आहे. परंतु या आजाराने मला निरोगी आयुष्य जगण्याचा मंत्र दिला. यात शांत व पुरेशा झोपेचे महत्त्व कळले. चांगली झोप झाल्यास ताणतणाव कमी होतो. उत्साह वाढतो. विशेषत: रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे इतर आजारांना दूर ठेवण्यास मदत होते.

-राजेंद्र जोधापूरकर

-झोपेची गरज लक्षात घ्या ()

प्रत्येकाचा ‘स्क्रीन टाईम’ वाढलेला आहे. परिणामी, झोपेचे वेळापत्रक पार बदलून गेले आहे. विशेषत: युवक -युवतींमध्ये अपुऱ्या झोपेच्या समस्या दिसून येऊ लागल्या आहेत. यामुळे वेळीच सावध होऊन झोपेची गरज लक्षात घेणे आवश्यक आहे. कोरोनाशी लढा देत असताना शांत झोपेचे महत्त्व जाणले. तेव्हापासून अनिद्रेवर नियंत्रण व झाेपेचे व्यवस्थापन करण्यास इतरांना प्रवृत्त करीत आहे.

-मालती डोंगरे, मेट्रन, मेयो

-निरोगी आरोग्यासाठी झोप महत्त्वाची()

झोप लागणे, ती अखंड टिकलेली असणे आणि झोपेतून जागे झाल्यावर ताजेतवाने वाटणे, हे निरामय स्थितीचे लक्षण आहे. या तिन्ही घटनांपैकी कोणतेही एक किंवा तिन्हींत आलेल्या अडचणीला निद्रानाश म्हणतात. दीर्घ काळ निद्रानाश हे मानसिक संतुलन बिघडण्यासोबतच कॅन्सर, आर्थ्रायटीस, मधुमेह, हृदयरोगासाठीही कारणीभूत ठरते. मेडिकलच्या श्वसनरोग विभागाने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात ६३ टक्के बाधितांना कोरोना होण्यापूर्वी झोपेची समस्या होती. पुरेशी झोप न झाल्यास रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. परिणामी, कोरोना संसर्गाचा धोका वाढत असल्याचे या अभ्यासातून समोर आले. या सर्वांवर पुरेशी व शांत झोप हाच एकमेव उपाय आहे.

-डॉ. सुशांत मेश्राम

प्रमुख श्वसनरोग विभाग, मेडिकल

-वयोगटानुसार अशी असावी झोप

-० ते १ वयोगट - २० ते २२ तासांची झोप

-१ ते ५ वयोगट - १२ तासांची झोप

- ५ ते १२ वयोगट - १० तासांची झोप

- १२ ते १८ वयोगट -८ ते ९ तासांची झोप

- १८ ते ४५ वयोगट - ७.३० ते ८ तासांची झोप

- ४५ व त्यापेक्षा जास्त वयोगट- ६ तासांची झोप

-झोपेचे फायदे

:: हृदय निरोगी रहाण्यास मदत होते. अपुऱ्या झोपेमुळे अनियमित रक्तदाब व रक्तातील कोलेरोस्टॉल वाढतो.

:: ताणतणाव कमी होतो.

:: तणावाची संप्रेरके कमी स्रवतात. पर्यायाने रक्तदाब नियमन व हृदयासाठी उपयुक्त ठरते.

:: स्मरणशक्ती व एकाग्रता चांगली राहते.

:: शरीर झोपलेले असले तरीही मेंदू, दिवसभरातील व पूर्वीच्या घटना, भावना, स्मृती, अनुभव वगैरेंची सांगड घालण्याचे महत्त्वाचे काम करते.

:: उत्साह व सतर्कता वाढते.

:: झोपेमध्ये पेशी जास्त प्रथिने निर्माण करतात, याचा उपयोग नादुरुस्त पेशींची, स्नायूंची दुरुस्ती व जोपासना होते.

:: नैराश्य कमी होण्यास मदत होते.

:: शारीरिक आजार बरे होण्यास व एकूणच प्रतिबंध होण्यास मदत होते.