शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या आकडेवारीच्या चारपट कोरोना मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपा प्रशासनाकडून शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी दररोज जाहीर केली जाते. परंतु प्रशासनाकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपा प्रशासनाकडून शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी दररोज जाहीर केली जाते. परंतु प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणारे आकडे आणि शहरातील दहन घाटावर करण्यात आलेले अंत्यसंस्कार, याचा विचार करता, जाहीर करण्यात येणाऱ्या आकडेवारीच्या चौपट अंतिम संस्कार होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

सोमवारी जिल्ह्यात ८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात शहरातील ५४, ग्रामीणमधील २५, तर जिल्ह्याबाहेरील १० जणांचा समावेश होता. परंतु शहरातील १४ घाटांवर सोमवारी तब्बल ३९२ मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यात आले. यात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २८८ इतकी आहे, तर १०४ नॉनकोविड मृत्यूची नोंद घाटावर करण्यात आल्याचे ‘लोकमत’ चमूने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले.

एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यात गृह विलगीकरणातील रुग्णांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याचा परिणाम शहरातील दहन घाटांवर दिसू लागला आहे. शहरातील घाटांवर दररोज ३५० ते ४०० अंतिम संस्कार होत आहेत. शहरातील प्रमुख पाच घाटांवर दररोज ४० ते ६० मृतदेहांवर अंतिम संस्कार केले जात आहेत.

....

प्रमुख घाटांवर वेटिंग

शहरातील गंगाबाई घाट, मोक्षधाम, मानेवाडा व अंबाझरी या प्रमुख घाटांवर दररोज ४० ते ६० कोविड मृतकांवर अंतिम संस्कार होतात. एकाचवेळी आठ ते दहा मृतदेह अंतिम संस्कारासाठी येत असल्याने मृतकांच्या नातेवाईकांना अंतिम संस्कारासाठी ओटे खाली होण्याची प्रतीक्षा करावी लागते. अनेकदा दीड ते दोन तास प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील घाटावर रात्री उशिरापर्यंत चिता धुमसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

....

१५ दिवसात ४ हजाराहून अधिक अंतिम संस्कार

कोरोना प्रकोपामुळे शहरात दररोज २५० हून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. यात रुग्णालयांतील रुग्णांच्या मृत्यूसोबतच गृह विलगीकरणात असलेल्यांचाही समावेश आहे.

गृह विलगीकरणातील असलेल्यांची नोंद होत नसल्याने त्यांचा कोविड मृत्यूत समावेश होत नसल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

...

दररोज ७० ते ८० नैसर्गिक मृत्यू

नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास आहे. शहरात दररोज ७० ते ८० मृत्यू नैसर्गिक व आजारामुळे होतात. परंतु कोरोना संक्रमणामुळे मृतकांचा आकडा हा ३०० ते ४०० पर्यंत पोहोचला आहे. यामुळे प्रमुख घाटावर एकाचवेळी आठ ते दहाजणांवर अंतिम संस्कार करावे लागत आहेत. ओटे खाली नसल्याने खालील जागेतही अंतिम संस्कार होत आहेत.

....

शहरातील घाटांवर सोमवारी करण्यात ओलेले अंत्यविधी...

घाट अंत्यविधी कोविड नॉन कोविड

सहकारनगर २० ११ ० ९

मानेवाडा ६३ ४३ २०

मोक्षधाम ४२ ३२ १०

अंबाझरी घाट ५२ ४३ ०९

दिघोरी-वाठोडा ४० २७ १३

गंगाबाई ६० ५० १०

शांतीनगर १२ ०९ ०३

वैशालीनगर २३ १४ ०९

मानकापूर २५ १८ ०७

पारडी घाट १८ १० ०८

पुणापूर घाट ०३ ०१ ०२

भरतवाडा घाट ०३ ०१ ०२

कळमना ०१ ०१ ००

नारा १३ ०९ ०४

एकूण ३९२ २८८ १०४

.................

...