शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा पुन्हा ब्लास्ट, ६६ दिवसांनी ५०० पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:09 IST

नागपूर : कोरोनाबाबत वाढलेली बेफिकरी, कमी झालेला मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा व सॅनिटायझरचा कमी झालेल्या वापरामुळे मागील ...

नागपूर : कोरोनाबाबत वाढलेली बेफिकरी, कमी झालेला मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा व सॅनिटायझरचा कमी झालेल्या वापरामुळे मागील चार दिवसांत १३९८ नव्या रुग्णांची भर पडली. गुरुवारी रुग्णसंख्येत तब्बल ५०० नव्या रुग्णांची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का बसला. बाधितांची एकूण संख्या १३७४९८ झाली असून आज ५ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ४२१५ वर पोहोचली.

केंद्रीय आरोग्य पथकाने नुकताच नागपूर जिल्ह्याचा आढावा घेतला. यात वाढत्या रुग्णसंख्येला घेऊन चिंता व्यक्त केली होती. त्यांनी कमी झालेल्या चाचण्या वाढविण्याच्या व बाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयितांचे ट्रेसिंग वाढवून त्यांची चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला होता. परिणामी, मागील दोन दिवसांपासून चाचण्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. आज नागपूर जिल्ह्यात ५०८५ संशयितांच्या चाचण्या झाल्या. यात ४०२२ आरटीपीसीआर तर १०६३ रॅपीड अँटिजन चाचण्यांचा समावेश होता. आरटीपीसीआरमधून ४५७ तर अँटिजनमधून ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या रुग्णामंध्ये शहरातील ४४५, ग्रामीणमधील ५३, तर जिल्ह्याबाहेरील २ रुग्ण आहेत. मृतांमध्ये आज शहरातील २, ग्रामीणमधील १ तर जिल्ह्याबाहेरील २ रुग्णांचे बळी गेले. २१६ रुग्ण बरे झाले असून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १२९७३६ झाली आहे. ३५४७ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

- ५ डिसेंबर रोजी होती ५२७ रुग्णांची नोंद

नागपूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात दैनंदिन रुग्णांची संख्या ५०० वर गेली होती. सप्टेंबर महिन्यात त्यात वाढ होऊन २००० वर पोहोचली; परंतु ऑक्टोबरपासून त्यात घट होऊ लागली होती. १७ ऑक्टोबर रोजी ५४० रुग्णसंख्येच्या नोंदीनंतर १ डिसेंबर रोजी ५१५, ३ डिसेंबर रोजी ५३६, तर ५ डिसेंबर रोजी ५२७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल ६६ दिवसांनी आज बाधितांची संख्या ५०० झाली.

-मागील पाच महिन्यांतील रुग्णसंख्येचा उच्चांक

१७ ऑक्टोबर ५४०

१ डिसेंबर ५१५

३ डिसेंबर ५३६

५ डिसेंबर ५२७

११ फेब्रुवारी ५००

-दैनिक चाचण्या : ५०८५

-बाधित रुग्ण : १३७४९८

_-बरे झालेले : १२९७३६

- उपचार घेत असलेले रुग्ण : ३५४७

- मृत्यू : ४२१५