शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पुन्हा हजाराजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:11 IST

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव मागील तीन दिवसांपासून कमी होताना दिसून येत असताना मंगळवारी पुन्हा उसळी मारली. कोरोनाबाधितांची संख्या हजारजवळ ...

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव मागील तीन दिवसांपासून कमी होताना दिसून येत असताना मंगळवारी पुन्हा उसळी मारली. कोरोनाबाधितांची संख्या हजारजवळ गेली. ९९५ नव्या रुग्णांची भर पडली तर १० बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या १५१६६०, तर मृतांची संख्या ४३५१ झाली. चाचण्यांच्या संख्येने आज पुन्हा ११ हजारांचा टप्पा ओलांडला. चाचण्यांच्या तुलनेत ८.६९ टक्के पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

नागपूर जिल्ह्यात जानेवारी महिन्यापर्यंत २५० ते ३००, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३५० ते ४००, १० ते १५ फेब्रुवारीपर्यंत ४५० ते ५००, १५ ते २३ फेब्रुवारीपर्यंत ६०० ते ७००, तर २४ फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत ८०० ते १००० दरम्यान दैनंदिन रुग्ण आढळून येत होते. एकूणच रुग्ण वाढत आहे. तर, मागील ७ दिवसांपैकी ३ दिवस मृत्यूंची संख्या १० झाली आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे कठोरतेने पालन होणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

- ८३८६ आरटीपीसीआर तर ३०६० अँटिजेन चाचण्या

लक्षणे असलेल्यांना किंवा तातडीने चाचणीची गरज असलेल्यांचीच रॅपिड अँटिजेन करण्याच्या सूचना आहेत. परंतु जिल्ह्यात या चाचण्यांची संख्या वाढली आहे. आज ८३८६ आरटीपीसीआर तर ३०६० रॅपिड अँटिजेन असे एकूण ११४४६ चाचण्या झाल्या. यात आरटीपीसीआरमधून ९४८ तर अँटिजेन चाचणीतून ४७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ‘एम्स’च्या प्रयोगशाळेत ८६, मेडिकलच्या प्रयोगशाळेत १७१, मेयोच्या प्रयोगशाळेत १७६, नीरीच्या प्रयोगशाळेत ६६, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत ४५, तर खासगी लॅबमधून ४०४ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

- शहरात ७७७, ग्रामीणमध्ये १२५ रुग्ण

शहरात मंगळवारी ७७७, ग्रामीणमध्ये १२५ तर जिल्हाबाहेर ३ रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये शहरात ५, ग्रामीणमध्ये २ तर जिल्हाबाहेर ३ रुग्णांचे मृत्यू झाले. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्ण बरे होण्याचा दर घसरत चालला आहे. ९३ टक्के असलेला हा दर आज ९१ टक्क्यांवर आला आहे. आज ५७९ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १३८४६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

- मेयो, मेडिकलमधील खाटा होत आहेत फुल्ल

मेयो, मेडिकलमधील कोविड हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी ६०० खाटा आहेत. जानेवारी महिन्यात या दोन्ही रुग्णालयात कोरोनाचे शंभरही रुग्ण नव्हते. परंतु या महिन्यात रुग्णसंख्या वाढताच हॉस्पिटलच्या खाटा फुल्ल होऊ लागल्या आहेत. मेडिकलमध्ये जवळपास २०० तर मेयोमध्ये १५० रुग्ण उपचाराखाली आहेत. रोज यात भरही पडत आहे. एम्समध्ये ३८ रुग्ण आहेत. २५६३ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात असून ६२८१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

- दैनिक चाचण्या :११४४६

- बाधित रुग्ण : १५१६६०

- बरे झालेले : १३८४६५

- उपचार घेत असलेले रुग्ण : ८८४४

- मृत्यू : ४३५१