गुमथळा : गुमथळा (ता. कामठी) प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या टेमसना उपकेंद्रांत काेराेना लसीकरणाला साेमवार(दि. ५)पासून सुरुवात करण्यात आली. गुमथळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील गावे या केंद्रापासून बरीच लांब आहेत शिवाय, प्रवासाची साधने नाहीत. त्यामुळे नागरिकांना लसीकरण करण्यासाठी गुमथळा येथे येण्यासाठी त्रास व्हायचा. या केंद्रावर गर्दी हाेत असल्याने त्यांना बराच वेळ ताटकळत राहावे लागायचे. त्यात ज्येष्ठ नागरिकांची गैरसाेय व्हायची. ही गैरसाेय दूर करण्यासाठी टेमसना येथे लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुशांत बोडखे, आरोग्यसेविका विमल सोरते, सुनीता कुकडे यांचे मार्गदर्शनात लसीकरण केले जात आहे. आरोग्यसेवक विनोद पडोळे, आशासेविका शालू कृपाले, संगीता गजभिये, वर्षा येवले नागरिकांच्या मनातील काेराेना लसीबाबतचे गैरसमज दूर करत आहेत. या लसीकरणाच्या शुभारंभाप्रसंगी टेमसनाचे सरपंच अनिकेत शहाणे, आडका गावच्या सरपंच भावना चांभारे, ग्रामसेवक सुरेश डांगट, कैलास भेंडे, मुख्याध्यापिका सुनीता बागूलकर उपस्थित हाेते. या केंद्रावर टेमसना, आडका, परसोडी, कुसुंबी यासह परिसरातील गावांमधील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.
टेमसना येथे कोराेना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:09 IST