शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन वेतनाच्या प्रक्रियेत शाईची प्रत ठरली अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST

नागपूर : विभागातील सर्व कोषागार कार्यालयाकडून शाईच्या प्रतीचा चुकीचा आग्रह धरल्या जात असल्याने एप्रिल महिन्याचे वेतन मंजूर करण्यात आले ...

नागपूर : विभागातील सर्व कोषागार कार्यालयाकडून शाईच्या प्रतीचा चुकीचा आग्रह धरल्या जात असल्याने एप्रिल महिन्याचे वेतन मंजूर करण्यात आले नाही. त्यामुळे नागपूर विभागातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन वेतन रखडले आहे. शाईची प्रत येईस्तव जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी हमीपत्रावर वेतन देयके पारित करावेत, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.

खासगी प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिक्षण आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, ऑनलाईन अनुदान मंजूर झाले असताना शाईच्या प्रतीशिवाय कोषागार कार्यालय एप्रिल-२०२१ चे देयक मंजूर करीत नाही. वेतन पथक अधीक्षकांकडून बीडीएस काढून तसेच अधीक्षकांकडून हमीपत्र देऊनही कोषागार कार्यालयाकडून शाईची प्रत मिळाल्याशिवाय देयके मंजूर होणार नसल्याचे सांगण्यात येते. संघटनेने या निवेदनात २३ फेब्रुवारी २०२१ च्या शासन परिपत्रकाचा हवाला देत स्पष्ट केले की, वेतन पथक अधीक्षकाच्या हमीपत्रावर वेतन देयक पारित करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रमोद रेवतकर, कार्याध्यक्ष रहमतुल्लाह खान, सचिव विजय नंदनवार, ज्ञानेश्वर वाघ, संजय बोरगावकर, मोहन सोमकुवर आदींनी दिला आहे.