शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
4
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
5
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
6
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
7
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
8
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
9
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
10
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
11
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
12
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
13
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
14
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
15
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
16
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
17
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
18
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
19
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
20
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करा : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:08 IST

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असल्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.

ठळक मुद्देविविध राजकीय पक्षांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असल्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागपूर व रामटेक मतदारसंघात प्रत्येकी २४ असे ४८ फ्लाईट्स स्कॉड राहणार असून २४ तास आदर्श आचार संहितेच्या अंमलबजावणी संदर्भात देखरेख करणार आहेत. तसेच विविध राजकीय पक्षांची कार्यक्रम रॅली आदीवर नजर ठेवण्यासाठी व्हिडीओ व्हिजिलन्स टीम गठित करण्यात आली आहे. उमेदवारांच्या खचासंबंधी दैनंदिन नोंदी ठेवण्यात येणार असून उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे, असेही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी सांगितले. यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा रामटेक लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा आदी उपस्थित होत्या.या बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बंडोपंत टेभुर्णे, युवराज लाडे, बसपाचे उत्तम शेवडे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे अरुण लाटकर, रामेश्वर चरपे, बहुजन समाज पार्टीचे आकाश खोब्रागडे, भारतीय जनता पक्षाचे डॉ. राजीव पोतदार, अरविंद गजभिये, भोजराज डुंबे, संजय टेकाडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नितीन धांडे, भाकपचे श्याम काळे, अरुण वनकर, मनसेचे घनश्याम निखाडे तसेच सुनील मानेकर आदी विविध पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.मतदारांची ओळख पटविण्यासाठी यांचा आधारमतदान करताना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी ते मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त ११ पैकी एक फोटो ओळखपत्र दाखविणे बंधनकारक राहील. आवश्यक ओळखपत्र खालीलप्रमाणे१) पारपत्र (पासपोर्ट),२) वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स),३) केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम,४) सार्वजनिक मर्यादित कंपनीचे ओळखपत्र,५) बँक, पोस्टद्वारा वितरित छायाचित्र असलेले पासबुक,६) पॅन कार्ड,७) रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरअंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड,८) मनरेगांतर्गत निर्गमित जॉब कार्ड, केंद्र सरकारच्या९) छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन कागदपत्र१०) खासदार, आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र (केवळ त्यांच्या स्वत:साठी)११) आधार कार्ड१५ मार्चपर्यंत मतदार नोंदणीनवमतदारांसाठी दोनवेळा विशेष अभियान राबविण्यात आले आहे. परंतु मतदार नोंदणी अजूनही सुरूच आहे. ती येत्या १५ मार्चपर्यंत सुरू राहील. ३१ जानेवारी २०१९ पर्यंतच्या मतदार नोंदणीची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यानंतर नोंंदणी करणाऱ्या मतदारांची पुरवणी यादी प्रसिद्ध केली जाईल, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.एकूण मतदार - (३१ जानेवारीपर्यंत)लोकसभा            पुरुष                   महिला             तृतीयपंथी               एकूण मतदारमतदार संघनागपूर               १०,८०,५७४       १०,४५,९३४          ६६                        २१,२६,५७४रामटेक              ९,८५,५३९         ९,१२,०६१             २३                         १८,९७,६२३-----------------------------------------------------------------------------------एकूण                 २०,६६,११३        १९,५७,९९५          ८९                        ४०,२४,१९७

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९nagpurनागपूर