शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’ वाढविणार दीक्षांतचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:23 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०४ वा दीक्षांत समारंभ हा आतापर्यंत सर्वात महागडा ठरू शकतो. ‘जीएसटी’ तसेच इतर बाबींचा फटका विद्यापीठाला बसणार असून मागील वेळच्या तुलनेत यंदा खर्च दुप्पट होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठाचा समारंभ ३ डिसेंबरयंदा दुप्पट खर्च होण्याचा अंदाज

आॅनलाईन लोकमतनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०४ वा दीक्षांत समारंभ हा आतापर्यंत सर्वात महागडा ठरू शकतो. ‘जीएसटी’ तसेच इतर बाबींचा फटका विद्यापीठाला बसणार असून मागील वेळच्या तुलनेत यंदा खर्च दुप्पट होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.नागपूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. ‘एआयसीटीई’चे चेअरमन डॉ.अनिल सहस्रबुद्धे हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. १०३ व्या दीक्षांत समारंभात पदके व पुरस्कार वगळता ६ लाख ५८ हजार रुपयांचा खर्च आला होता. पदके व पुरस्कार यांच्यावर सुमारे ७ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. यंदा ‘जीएसटी’ लागू झाल्याने तसेच इतर कारणांमुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. केवळ पदके व पुरस्कार यांच्यावर सुमारे १२ लाख रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. तर दीक्षांत समारंभाच्या आयोजनात १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. वित्त व लेखा विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली असता ‘जीएसटी’मुळे खर्च वाढणार असल्याचे एका अधिकारयाने सांगितले. पदक व पुरस्कारांवर होणारा खर्च हा एकूण खर्चात समाविष्ट करण्यात येत नाही. दानदात्यांनी दिलेल्या निधीतून हा खर्च करण्यात येतो. दीक्षांत समारंभाच्या आयोजनासाठी अर्थसंकल्पात १५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. इतकी रक्कम खर्च होणार नाही, मात्र मागील वेळच्या तुलनेत नक्कीच यंदा जास्त खर्च होईल, असे वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे यांनी सांगितले.दीक्षांत भट सभागृहातचगेल्या काही वर्षांपासून विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ हा डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहातच आयोजित करण्यात येतो. मात्र यंदा मनपाच्या नवनिर्मित सुरेश भट सभागृहात हे आयोजन करण्याचा कुलगुरूंचा मानस होता. ३ डिसेंबर रोजी तिथेच दीक्षांत समारंभ होणार असून विद्यापीठाने ‘बुकिंग’देखील केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.पुढील दीक्षांत फेब्रुवारीनंतरच२०१७ साली अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या दीक्षांत समारंभाचे आयोजन लगेच करण्यात येणार आहे. १०४ वा दीक्षांत समारंभ आटोपला की पुढील दीक्षांतची तयारी सुरु करण्यात येईल. साधारणत: फेब्रुवारी महिन्यात १०५ वा दीक्षांत समारंभ होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.