शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विदेशातील प्रवेशांवर संक्रांत

By admin | Updated: October 5, 2016 02:58 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०३ व्या दीक्षांत समारंभाचा अद्याप मुहूर्त निघालेला नाही.

बाहेरील विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांकडे मूळ पदवीची मागणी : नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचा अद्याप मुहूर्तच नाहीयोगेश पांडे  नागपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०३ व्या दीक्षांत समारंभाचा अद्याप मुहूर्त निघालेला नाही. त्यामुळे मागील वर्षी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना अद्यापपर्यंत पदवी प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांची अडचण झाली असून काही विद्यार्थ्यांच्या विदेशातील विद्यापीठांतील प्रवेशांवर संक्रांत आली आहे. बाहेरील विद्यापीठांनी मूळ पदवी सादर करण्याची दिलेली मुदत संपत आली असल्यामुळे आता पदवी कुठून आणावी असा यक्षप्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. जर ठराविक वेळेत पदवी सादर केली नाही तर मागील वर्षी घेतलेला प्रवेश अर्ध्यावरच सोडावा लागणार आहे.मागील वर्षी नागपूर विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी विदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतले. काही विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील ‘सदर्न कॅलिफोर्निया’ विद्यापीठात प्रवेश घेतले. त्यावेळी विद्यार्थ्यांकडे मूळ पदवी नसल्यामुळे तात्पुरती पदवी त्यांनी सादर केली होती. संबंधित विद्यापीठाने त्यांना मूळ पदवी सादर करण्यासाठी एक वर्षाचा अवधी दिला होता. नागपूर विद्यापीठाचा १०३ वा दीक्षांत समारंभ झाल्यानंतर ही पदवी आपण सहजपणे सादर करू असा विद्यार्थ्यांना विश्वास होता परंतु त्यांची ही अपेक्षाच फोल ठरली.नागपूर विद्यापीठाचा १०३ वा दीक्षांत समारंभ १ आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली होती. विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी आमच्याकडे अडचणी मांडल्या. आम्ही एकूण परिस्थिती सांगणारे पत्र लिहून दिले आहे. शिवाय तात्पुरते पदवी प्रमाणपत्रदेखील दिले आहे. परंतु अमेरिकेतील त्या विद्यापीठाला मूळ पदवी प्रमाणपत्रच हवे आहे. दीक्षांत समारंभ होत नाही, तोपर्यंत आम्ही पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही. आमचे हात कायद्याने बांधलेले आहे. अमेरिकेतील विद्यापीठाचा भारतातील विद्यापीठांवर विश्वास नाही, हेच यावरून दिसून येत आहे.- डॉ.सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू लेटलतिफीचा फटका विद्यार्थ्यांना का ?नागपूर विद्यापीठातून २०१५ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या एका विद्यार्थिनीने ‘सदर्न कॅलिफोर्निया’ विद्यापीठात ‘एमएस’साठी प्रवेश घेतला. तिचे एक वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु तिला मूळ पदवी न मिळाल्याने तिचा प्रवेश रद्द होण्याची चिन्हे आहेत. तिच्यासारखे आणखी विद्यार्थीदेखील तिथे आहेत. विद्यापीठाने १ आॅक्टोबरला जरी दीक्षांत समारंभ घेतला असता तरी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असता. परंतु मुख्य अतिथी न मिळाल्याने विद्यापीठाने हात वर केले. विद्यापीठाच्या लेटलतिफीचा विद्यार्थ्यांनी फटका का सहन करावा, असा प्रश्न संबंधित विद्यार्थिनीचे नातेवाईक पवन सारडा यांनी उपस्थित केला.