शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर ‘व्हील चेअर लिफ्ट’ची सोय; दिव्यांग पोहोचतील थेट बर्थवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 10:10 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वेस्थानकावरील सुविधेत वाढ करून ‘व्हील चेअर लिफ्ट’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना कार टू कोच सुविधा नि:शुल्क उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देकार टू कोच अपंग, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांसाठी सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वेस्थानकावरील सुविधेत वाढ करून ‘व्हील चेअर लिफ्ट’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना कार टू कोच सुविधा नि:शुल्क उपलब्ध होणार आहे. नागपूर विभागाला मिळालेली ही सेंट्रल रेल्वेतील आणि राज्यातील पहिलीच ‘व्हील चेअर लिफ्ट’आहे.इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कापार्रेशनतर्फे (आयआरसीटीसी) सामाजिक जबाबदारीतून ही व्हील चेअर लिफ्ट नागपूर विभागाला देण्यात आली आहे. चेन्नईच्या कॅलिडायी मोटर वर्क्स कंपनीमार्फत ही सेवा नि:शुल्क देण्यात येणार असून देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कॅलिडायी कंपनीवर असणार आहे. तीन लाख किंमतीची ही ‘व्हील चेअर लिफ्ट’ प्रवाशांसाठी सुविधाजनक ठरणार आहे. अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण चारचाकी वाहनाने स्टेशनपर्यंत येतात. परंतु, बर्थपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र या अत्याधुनिक व्हील चेअर लिफ्टमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कार पार्किंगमध्ये उतरल्यानंतर प्रवाशांना आता थेट बर्थपर्यंत पोहचवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. कॅलिडायी कंपनीने ही सुविधा प्रवाशांना देण्यासाठी एम. गॅबरियल नावाची एक व्यक्ती उपलब्ध करून दिली आहे. ती दोन्ही हातांनी दिव्यांग आहे. जे प्रवाशी चालूच शकत नाही त्यांना कोणत्याही अडथळ््याविना बर्थपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यापूर्वी रेल्वेस्थानकावर कुली दिव्यांग प्रवासी, रुग्णांना व्हील चेअरने प्लॅटफार्मवर पोहोचवित असत. प्रवाशांची ने आण करणे सुलभ व्हावे यासाठी कुलींना टप्प्याटप्प्याने या मशीनसंदर्भात प्रशिक्षित केले जाणार असल्याचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्रा यांनी सांगितले.अशी काम करते ‘व्हील चेअर लिफ्ट’व्हील चेअरला लिफ्टशी जोडण्यात आले आहे. लिफ्टला मागील बाजूस एक सर्किट आहे. या सर्किटद्वारे आॅटोमॅटिक कमांडनुसार बॅटरी कार चालते. कारपासून रेल्वेगाडीपर्यंत लिफ्टच्या साह्याने प्रवाशाला नेण्यात येते. प्लॅटफार्मवर पोहोचल्यानंतर ही लिफ्ट चेअरपासून वेगळी करण्यात येते. त्यानंतर व्हिल असलेली चेअर कोचच्या दारातून आत बर्थपर्यंत जाते.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर