शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोळ्या घालण्याचा फलक ठरला वादग्रस्त

By admin | Updated: January 25, 2017 02:58 IST

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आंदोलनकर्त्यांना फलक दाखवून, घोषणा करून सूचना देतात,

आंदोलकांना सूचना देण्याचा हेतू होता : पोलिसांचा खुलासा नागपूर : कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आंदोलनकर्त्यांना फलक दाखवून, घोषणा करून सूचना देतात, तशी ती केवळ एक सूचना होती. गोळी चालविण्याचा फलक दाखविणे म्हणजे आंदोलकांवर पोलिस गोळी चालविणार आहे, असे नव्हे. तसा आम्ही विचारही करू शकत नाही, असा खुलासा अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले. हे राम, नथुराम नाटकाचा प्रयोग रविवारी येथील देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या प्रयोगाला विरोध करणाऱ्यांना आंदोलकांसमोर शहर पोलिसांनी एक फलक दाखवला. ‘सुनो बलवाँईयो आप का जमाव गैरकानुनी है। आप लोग यहाँसे चले जाव। नही तो आप पर पक्की गोली चलाई जायेंगी। चले जाव। चले जाव। चले जाव।’असे त्यात नमूद होते. लोकमतने आज त्या फलकासंबंधाचे वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली. पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत या वादग्रस्त फलकाचा विषय पत्रकारांनी लावून धरला. पोलिसांनी असा फलक दाखवण्यामागे काय उद्देश होता, गोळी घालण्याची ही धमकी पोलीस कशी देऊ शकतात, ते कोणत्या कायद्यात बसते, असे एक ना अनेक प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या उपस्थितीत उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त शर्मा म्हणाले, गोळी घालण्याचा इशारा देणारे फलक दाखविणे म्हणजे धमकी नव्हे. आंदोलनाची परवानगी पोलिसांकडून घेतली नव्हती. त्यामुळे ते आंदोलन गैरकायदेशीर ठरते. कोणत्याही ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमविणे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे. अशावेळी सुरक्षा यंत्रणेतर्फे सुरक्षासंबंधाने आंदोलनकर्त्यांना सूचना दिल्या जातात. त्याला जुमानत नसेल आणि परिस्थिती चिघळत असेल तर पोलीस आंदोलकांवर पाण्याचा मारा, लाठीमार, अश्रुधूर सोडतात. याचाच एक भाग म्हणून आम्ही सूचनांचे दोन फलक दाखविले. मात्र, दुसरा फलक कुणी ध्यानात घेतला नाही आणि या फलकाचा गैरसमज करण्यात आला.