शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त कोथमिरेंची गडचिरोलीत ‘आमद’ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:07 IST

बदली होऊन नऊ दिवस : वरिष्ठ पातळीवर कारवाईसाठी चर्चा नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : खंडणीच्या आरोपामुळे ...

बदली होऊन नऊ दिवस : वरिष्ठ पातळीवर कारवाईसाठी चर्चा

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : खंडणीच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी राजकुमार कोथमिरे यांची बदली होऊन नऊ दिवस झाले. मात्र, त्यांनी अद्याप गडचिरोलीत ‘आमद’ दिलेली नाही. त्यामुळे पोलिस दलात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

मायानगरी मुंबईत रमलेले, तेथील नाईटलाईफची सवय जडलेले पोलीस अधिकारी मुंबईबाहेर बदली झाली की नाकतोंड मुरडतात. त्यातल्या त्यात गडचिरोली, गोंदियाच्या नावाने अनेकांना शहारे येतात. त्यांच्या नावे भले कितीही एनकाऊंटर असो, नक्षलग्रस्त गडचिरोली-गोंदियात बदली झाली की अनेकांना धडकी भरते. ते तिकडे जाण्याऐवजी ‘मॅट, सीक लिव्ह’चा पर्याय निवडतात. एनकाऊंटर स्पेशालिस्ट दया नायक असो की वादग्रस्त सचिन वाझे हे दोघेही गडचिरोली-गोंदिया रेंजमध्ये बदली झाल्यानंतर इकडे रुजूच झाले नाहीत. २०१४ नंतर दया नायक यांची पुन्हा मे २०२१ मध्ये गोंदियाला बदली झाली. मात्र त्यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेऊन या बदलीवर स्थगिती मिळवली. याच दरम्यान, मुंबईतील बिल्डर मयूरेश राऊत याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग तसेच त्यांचे तेव्हाचे खासमखास समजले जाणारे प्रदीप शर्मा (माजी पोलीस अधिकारी) आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी कोट्यवधींची खंडणी उकळल्याची तक्रार झालेली आहे. या प्रकरणाची चौकशी सीआयडी करीत आहे. या पार्श्वभूमीवर, कोथमिरे यांची पोलीस महानिरीक्षक गडचिरोली यांचे वाचक म्हणून बदली करण्यात आल्याचा आदेश ६ मे रोजी काढण्यात आला. बदली झालेले ठिकाण एक हजार किलोमीटरच्या आतमध्ये असेल तर संबंधित अधिकाऱ्याला तेथे रुजू होण्यासाठी सात दिवसांचा अवधी दिला जातो. मात्र आज शनिवारी नऊ दिवस होऊनही कोथमिरे यांनी गडचिरोलीला आमद (रुजू होणे) दिलेली नाही. दरम्यान, नमूद कालावधी संपूनही ते गडचिरोलीत रुजू न झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणती कारवाई केली जाते, त्याकडे संपूर्ण पोलिस दलाचे लक्ष लागले आहे.

---

‘ऑडिओ क्लिप’मुळे अडचण

विशेष म्हणजे, कोथमिरे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या बिल्डरने पुरावा म्हणून कोथमिरे आणि मयूरेश राऊत यांच्या पत्नीत फोनवर झालेल्या संभाषणाच्या क्लिप दिल्या आहेत. त्या तीन क्लिप व्हायरल झाल्याने कोथमिरेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

---

....तर कारवाईबाबत चर्चा : डीआयजी पाटील

कोथमिरे अजून रुजू झाले नाहीत. ठोस कारणही कळले नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का, अशी विचारणा गडचिरोली-गोंदिया रेंजचे डीआयजी संदीप पाटील यांच्याकडे केली असता, ‘सोमवारपर्यंत वाट बघू. नंतर वरिष्ठांशी चर्चा करून कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल’, असे डीआयजी पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

---