शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराचा खर्च नियंत्रित करणार- आरोग्यमंत्री दीपक सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:17 IST

उपचाराचा वाढता खर्च नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारही महाराष्ट्रात क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट लागू करण्यावर विचार करीत आहे.

- महाराष्ट्रात लागू होणार ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट कायदा लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपचाराचा वाढता खर्च नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारही महाराष्ट्रात क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट लागू करण्यावर विचार करीत आहे. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनसह खासगी डॉक्टरांसोबतही चर्चा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विजय वडेट्टीवार, दिलीप वळसे पाटील आदींनी लक्षवेधी सूचना सादर करीत रक्ताची नासाडी, त्याची विक्री आणि जीवन अमृत योजनेंतर्गत केंद्र स्थापित झाले नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले की, महाराष्ट्रात ११.२३ लाख युनिट रक्ताची गरज आहे. त्या तुलनेत १६.१७ लाख युनिट रक्त संकलन होते. २.४ टक्के रक्त वाया जाते. एकूण देशाच्या तुलनेत ते कमी आहे. ‘ए निगेटिव्ह’, ‘बी निगेटिव्ह’ आणि ‘ओ निगेटिव्ह’ ग्रुपच्या रक्ताचे संकलन केले जात नाही. आवश्यकता पडल्यास रक्तदात्यांची मदत घेतली जाते.रक्त विकणाºया एनजीओंवर होणार कारवाईअनेक एनजीओ या रक्त विकतात, ही बाब भाजपाचे ज्येष्ठ सदस्य एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. खडसे यांनी सांगितले की, मी स्वत: रक्तदान करतो. परंतु ज्या रक्तपेढीला मी रक्तदान करतो ती रक्तपेढी रक्त विकत असेल तर माझ्या रक्तदानाचा उपयोग काय? उद्या रक्तदान करणारेही आपले रक्त विकू लागले तर काय होणार, असा थेट प्रश्न उपस्थित केला. यावर रक्त विकणाºया संस्थांवर १४० नियमांतर्गत कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी जाहीर केले. आरोग्य विभाग एनजीओला रक्त संकलनाचा परवाना देतो. त्याचे नियंत्रण अन्न व औषध विभागा(एफडीए)कडे असते. गडबड झाल्याचे आढळून आल्यास विभागातर्फे परवाना रद्द करून कारवाई करण्यास एफडीएला सांगितले जाईल, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.रक्ताची नासाडी रोखणारसंकलित केलेले रक्त हे ३२ दिवसांपर्यंतच टिकून राहत असल्याने भाजपाचे एकनाथ खडसे यांनी रक्तातून प्लाझ्माला वेगळे करण्याची यंत्रणा निर्माण करण्याची मागणी केली. यावर डॉ. सावंत यांनी मुंबईच्या केईएम रुग्णालयात प्लाझ्मा वेगळा करण्याचे केंद्र प्रस्तावित असल्याचे सांगितले. तसेच सरकार प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र स्थापित करण्यासाठी तयार असल्याचेही स्पष्ट केले.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७