शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तिरस्कार मिळाला तरी जिव्हाळा कायम ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 23:04 IST

एखाद्या वेळी तिरस्कार मिळाला तरी जिव्हाळा कायम ठेवा. कुणामधील त्रुटी दिसल्या तरी सर्वांशी आपलेपणाने वागा, या शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या नेत्यांना वडिलकीचा उपदेशच दिला.

ठळक मुद्देसरसंघचालकांचा भाजपला वडिलकीचा उपदेश : ‘जिव्हाळा’ पुरस्कारांचे वितरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : संघासाठी जिव्हाळा व विचारधारा या एकच गोष्टी आहेत. एखाद्या व्यक्तीशी किंवा विचारांशी आत्मियतेचा भाव जोडण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. आत्मियतेमुळे लोक व भावना एकत्र येतात. एखाद्या वेळी तिरस्कार मिळाला तरी जिव्हाळा कायम ठेवा. कुणामधील त्रुटी दिसल्या तरी सर्वांशी आपलेपणाने वागा, या शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या नेत्यांना वडिलकीचा उपदेशच दिला. गुरुवारी ‘दान पारमिता’तर्फे जिव्हाळा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.सायंटिफिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, ‘दान पारमिता’चे संरक्षक डॉ.विलास डांगरे, कार्याध्यक्ष अविनाश संगवई, आशुतोष फडणवीस हे प्रामुख्याने उपस्थित होते. मुळात आत्मियता जगाचे मूळच आहे. जिव्हाळा कुणीही जन्मत: घेऊन येत नसतो, तर संस्कारातून तो घडत जातो. परोपकारातूनदेखील जिव्हाळा मिळतो. निवडणुकांमध्ये परोपकार करण्याची प्रवृत्ती बळावते. अनेकांचा त्यात स्वार्थ असतो. स्वार्थ सरला की परोपकारदेखील करत नाहीत. देशात जातीपातीचा भेद नको असे बहुतांश जणांना वाटते. त्यांना प्रत्यक्षात तसे वागणे भाग पाडण्यासाठी जिव्हाळाच महत्त्वाचा ठरतो. विलास फडणवीस यांना पाहिले की संघच दिसायचा. संघाचा कोणता स्वयंसेवक उत्तम अशी चर्चा काही जण करतात. जो माणसे जोडू शकतो, माणसांसोबत माणुसकीने वागतो तोच उत्तम स्वयंसेवक असे प्रतिपादन डॉ.मोहन भागवत यांनी केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जातीभेदाला स्थान नाही. सर्व जण एकाच परिवाराचे घटक आहेत. विलास फडणवीसांसारख्या व्यक्तींनी जिव्हाळ्याच्या माध्यमातून संघाचा विस्तार केला. कार्यकर्त्याच्या डोक्यावर बर्फ, तोंडात साखर, अंत:करणात प्रेरणा व पायाला भिंगरी लावलेली असली पाहिजे. कार्यकर्ता म्हणून संघ व अभाविपमध्ये काम करताना बरेच काही शिकलो व या संघटनांमुळेच मी घडलो. विचारधारेपेक्षा जिव्हाळा जास्त महत्त्वाचा असतो, असे नितीन गडकरी म्हणाले. यावेळी वेद विद्या वर्धिनी गुरुकुलम्ला ‘जिव्हाळा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विवेक पांढरीकर गुरुजी यांनी पुरस्कार स्वीकारला. अविनाश संगवई यांनी प्रास्ताविक केले, तर सृष्टी राऊत व सुशीलानी चकमा या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.बरेचदा राजकारणातील जिव्हाळा ‘कृत्रिम’राजकारणात अनेकजण ‘चमकेश’ असतात. तेथील जिव्हाळा अनेकदा कृत्रिम असतो. कार्यकर्त्यांसोबत कौटुंबिक जिव्हाळा हवा. कार्यकर्त्याला गुणदोषासह स्वीकारले पाहिजे. त्याचे दोष कमी करण्याची जबाबदारी संघटनेची असते, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतNitin Gadkariनितीन गडकरी