शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राज्यमंत्री दादाजी भुसे यांना अवमानना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:31 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी एका प्रकरणात ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांना अवमानना नोटीस बजावली.

ठळक मुद्देन्यायालयीन आदेशाचे केले नाही पालन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी एका प्रकरणात ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांना अवमानना नोटीस बजावली.आजनसरा, ता. हिंगणघाट (जि. वर्धा) येथील सरपंच रजनी कोसूरकर व उपसरपंच सुनील गुजरकर यांना १४ सप्टेंबर २०१४ रोजी अपात्र घोषित करण्यात आले. त्याविरुद्ध त्यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे अपील दाखल केले आहे. कायद्यानुसार हे अपील ३० दिवसांत निकाली काढणे आवश्यक होते. परंतु, भुसे यांनी हा कालावधी लोटूनही अपीलवर निर्णय दिला नाही. त्यामुळे कोसूरकर व गुजरकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या ३१ जानेवारी रोजी न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या अपीलवर तीन आठवड्यांत निर्णय देण्याचा आदेश भुसे यांना देऊन याचिका निकाली काढली होती. त्यानंतर भुसे यांनी या आदेशाचे पालन केले नाही. परिणामी कोसूरकर व गुजरकर यांनी उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांनी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर, भुसे यांना नोटीस बजावली व यावर चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. मंगेश बुटे व अ‍ॅड. रोमा सोनारे यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयministerमंत्री