शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

अष्टविनायक डेव्हलपर्सला ग्राहक मंचची चपराक : ग्राहकाची केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 20:55 IST

महिला ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या अष्टविनायक डेव्हलपर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचची चपराक बसली.

ठळक मुद्देपैसे घेतले, पण भूखंडाचा ताबा दिला नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महिला ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या अष्टविनायक डेव्हलपर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचची चपराक बसली. अष्टविनायक डेव्हलपर्सने महिला ग्राहकाकडून भूखंडाची पूर्ण रक्कम घेतली, पण त्यांना नोंदणीकृत विक्रीपत्र करून दिले नाही व भूखंडाचा ताबाही दिला नाही. या प्रकरणात मंचने महिला ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी केले.सरोज पाटील असे महिला ग्राहकाचे नाव असून त्या हिंगणा रोड येथील रहिवासी आहेत. पाटील यांना भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करून द्यावे किंवा काही कारणांमुळे विक्रीपत्र नोंदवणे अशक्य असल्यास त्यांना भूखंडाची सरकारी दराने किंमत अदा करण्यात यावी, असे आदेश मंचने डेव्हलपर्सला दिले. भूखंडाची किंमत अदा करण्यासाठी डेव्हलपर्सला एक महिन्याचा वेळ देण्यात आला. त्यानंतर संबंधित रकमेवर १२ मार्च २००७ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत १० टक्के व्याज लागू होईल असे स्पष्ट करण्यात आले. तसेच, पाटील यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ४० हजार व तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. ही रक्कमही डेव्हलपर्सनेच द्यायची आहे. मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्या चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी हा निर्वाळा दिला.तक्रारीतील माहितीनुसार, पाटील यांनी अष्टविनायक डेव्हलपर्सच्या मौजा वानाडोंगरी येथील ले-आऊट (ख. क्र. १०४, प.ह.क्र. ४६)मधील १६७५ चौरस फुटांचा एक भूखंड ९५ हजार रुपयात खरेदी केला. त्यांना त्या भूखंडाचे विक्रीपत्र करून देण्यात आले होते, पण ताबा देण्यात आला नाही. दरम्यान, डेव्हलपर्सने संबंधित जमिनीवर अष्टविनायक एम्पायर नावाच्या फ्लॅट स्कीमचे काम सुरू केले. पाटील यांनी त्यासंदर्भात विचारणा केली असता त्यांना १५०० चौरस फुटाच्या दुसऱ्या भूखंडाची नोटरी करून देण्यात आली. परंतु, आधीप्रमाणे नवीन भूखंडाचाही ताबा देण्यात आला नाही. परिणामी, पाटील यांना डेव्हलपर्स फसवणूक करीत असल्याचे कळल्यामुळे त्यांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. मंचने रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता वरील निर्वाळा दिला. डेव्हलपर्सने अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्याचे निरीक्षण निर्णयात नोंदविण्यात आले.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे