शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

न्यू संस्कृती लॅण्ड डेव्हलपरला ग्राहक आयोगाची चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:07 IST

नागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तक्रारकर्त्याच्या हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे न्यू संस्कृती लॅण्ड डेव्हलपर्स ॲण्ड बिल्डर्सला ...

नागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तक्रारकर्त्याच्या हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे न्यू संस्कृती लॅण्ड डेव्हलपर्स ॲण्ड बिल्डर्सला जोरदार चपराक बसली.

तक्रारकर्त्याला उर्वरित ३ लाख ५० हजार रुपये स्वीकारून दोन भूखंडांचे नोंदणीकृत विक्रीपत्र करून द्या व भूखंडांचा प्रत्यक्ष ताबा द्या किंवा काही तांत्रिक कारणांमुळे विक्रीपत्र करणे अशक्य असल्यास तक्रारकर्त्याकडून घेतलेले ३ लाख ५० हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करा, असे आदेश आयोगाने न्यू संस्कृती लॅण्ड डेव्हलपरला दिले. तसेच, तक्रारकर्त्याला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ३० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी २० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कम डेव्हलपरनेच द्यायची आहे. या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी डेव्हलपरला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तक्रारीवर आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

डॉ. सूर्यभान सातपुते असे तक्रारकर्त्यांचे नाव असून ते वडधामना, ता. हिंगणा येथील रहिवासी आहेत. तक्रारीतील माहितीनुसार, सातपुते यांनी न्यू संस्कृती लॅण्ड डेव्हलपरच्या मौजा व्‍याहाड येथील ले-आऊटमधील दोन भूखंड सात लाख रुपयांत खरेदी करण्यासाठी ३१ जुलै २०१५ रोजी करार केला. तसेच, त्याच दिवशी डेव्हलपरला धनादेशाद्वारे ३ लाख ५० हजार रुपये अदा केले. त्यानंतर डेव्हलपरने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सातपुते यांना भूखंडांचे नोंदणीकृत विक्रीपत्र करून दिले नाही. तसेच, सातपुते यांची रक्कमही परत केली नाही. परिणामी, सातपुते यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. त्यानंतर डेव्हलपरने आयोगाची नोटीस तामील होऊनही स्वत:ची बाजू मांडण्यासाठी हजेरी लावली नाही. करिता, आयोगाने तक्रारीवर एकतर्फी कारवाई करून रेकॉर्डवरील पुराव्यांच्या आधारावर हा निर्णय दिला.