शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

५० कोटींचे बांधकाम, तर २५ कोटींचे यंत्र

By admin | Updated: May 23, 2017 01:50 IST

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.

‘सुपर’च्या १०० कोटीतून साधणार विकास : ‘पेडियाट्रिक सर्जरी’साठी प्रयत्न होणारलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या निधीतून दरवर्षी २० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याचा आराखडा लवकरच शासनाला सादर केला जाणार असला तरी तूर्तास पुढील पाच वर्षांत या निधीतून ५० कोटींचे बांधकाम, २५ कोटींचे यंत्र व २५ कोटी मनुष्यबळावर खर्च करण्याचे स्वत: मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विदर्भच नाही तर आजूबाजूच्या राज्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सद्यस्थितीत हृदय शल्यचिकित्साशास्त्र, हृदयरोग, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, नेफ्रोलॉजी, यूरोसर्जरी व एन्डोक्रेनोलॉजी या आठ विभागातून रुग्णसेवा दिली जात आहे. यात आणखी नव्या विभागाची भर पडावी व रुग्णांना अद्ययावत उपचार मिळावेत म्हणून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार रुग्णालय प्रशासन कामाला लागले आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मधुकर परचंड यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी उपलब्ध करून दिलेल्या १०० कोटींच्या निधीमधून दरवर्षी २० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. २०१७-१८ मध्ये १० कोटी बांधकामावर, पाच कोटी यंत्रसामुग्रीवर तर पाच कोटी मनुष्यबळावर खर्च होणार आहे. अशाच पद्धतीने नियोजन पुढील पाच वर्षांसाठी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पहिल्या वर्षात ‘पेडियाट्रिक सर्जरी’ व ‘एन्डोक्रेनोलॉजी’चा वॉर्ड सुरू करण्याचा विचार आहे. यासंदर्भात संबंधित विभागप्रमुखांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.शिवाय, रक्तपेढीसाठी ‘ब्लड कॉम्पोनंट’ यंत्र, बाह्यरुग्ण विभागाचे बांधकाम, ‘ए’ विंगचे बांधकाम, अद्ययावत कॅथलॅब व प्रतीक्षालयाचे बांधकाम हाती घेण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. यासंदर्भात २ जून रोजी बैठक बोलविण्यात आली असून, प्रस्तावित कामांचे नियोजन केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.