२ बफर झोनची ५०० मीटरची अट शिथिल: नीरीची शिफारस स्वीकारणारनागपूर : कचरा डेपोपासून ५०० मीटरचा परिसर हा बफर झोनमध्ये येतो. या क्षेत्रात केलेले कुठलेही बांधकाम नियमित करता येत नाही. त्यामुळे ज्या कचरा डेपोत शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते, तेथे ही अट शिथिल करून १०० मीटर केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या निर्णयामुळे कचरा डेपोपासून १०० मीटर अंतरावर बांधकामे करण्याचा मार्ग मोकळा होईल.बफर झोनमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बांधकामे केली आहेत. ही बांधकामे नियमित केली जात नाही. यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. कचरा डेपोमुळे बफर झोनमध्ये होणाऱ्या प्रदूषणाचा अभ्यास करण्याची जबाबदारी नीरीकडे सोपविण्यात आली होती. ज्या ठिकाणी कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते तेथे बफर झोनची मर्यादा १०० मीटर करण्यास हरकत नाही, अशी शिफारस नीरीने आपल्या अहवालात केली आहे.महेश लांडगे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करीत पुणे जिल्ह्यातील भोसरी, मोशी हद्दीतील कचरा डेपोमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आलेला कचरा कोणतीही प्रक्रिया न करता टाकला जात असल्याचे सरकारचे लक्ष वेधले. संबंधित कचरा डेपो तेथून हटविण्याची नागरिकांची मागणी असूनही महापालिकेने अद्याप कुठलीच कार्यवाही केली नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी संनियंत्रण समितीच्या निकषानुसार महापालिकेच्या कचरा डेपोसाठी १६ जून २००९ रोजी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. (प्रतिनिधी)
कचरा डेपोपासून शंभर मीटरवर बांधकामास मंजुरी
By admin | Updated: December 24, 2014 00:49 IST