शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

‘एम्स’च्या पदभरतीत आता घटनात्मक आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:18 IST

केंद्रात घटनात्मक आरक्षणानुसार ओबीसी समाजाला २७ टक्के, एससी समाजाला १६ टक्के तर एसटी समाजाला ७.६ टक्के आरक्षण आहे. परंतु आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसाठी (एम्स) काढलेल्या ५२ पदांच्या जाहिरातीत या आरक्षणालाच धक्का दिला होता. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. अखेर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नागपूर एम्सच्या पदभरतीची जाहिरात मागे घेत नवीन जाहिरात काढली असून यात नियमानुसार ओबीसी, एससी, एसटींना आरक्षण देऊन चूक सुधारली आहे.

ठळक मुद्देएससी, एसटी व ओबीसींचे डावललेले आरक्षण मिळालेनागपूर एम्सच्या पदभरतीच्या जाहिरातीत सुधारणालोकमतचा प्रभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रात घटनात्मक आरक्षणानुसार ओबीसी समाजाला २७ टक्के, एससी समाजाला १६ टक्के तर एसटी समाजाला ७.६ टक्के आरक्षण आहे. परंतु आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसाठी (एम्स) काढलेल्या ५२ पदांच्या जाहिरातीत या आरक्षणालाच धक्का दिला होता. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. अखेर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नागपूर एम्सच्या पदभरतीची जाहिरात मागे घेत नवीन जाहिरात काढली असून यात नियमानुसार ओबीसी, एससी, एसटींना आरक्षण देऊन चूक सुधारली आहे.मिहानमध्ये २५२ एकरमध्ये उभारण्यात येणाऱ्या ‘एम्स’ची २०१८-१९ पासून सुरुवात होणार आहे. बांधकाम पूर्ण होईपर्यंत ‘एम्स’च्या एमबीबीएसचे वर्ग मेडिकल महाविद्यालयात भरणार आहे. पहिल्या टप्प्यात जुलै २०१८ पासून ५० जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या देखरेखीत नागपूर ‘एम्स’चा विकास होत आहे. या संस्थेने फेब्रुवारी २०१८ रोजी ‘एम्स’साठी आवश्यक असलेल्या आठ विद्याशाखेसाठी ५२ जागांची जाहिरात काढली. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीयांसाठी नोकरीविषयक जे घटनात्मक आरक्षण ठेवले त्याला मात्र साफ डावलले. केवळ सुप्रीम कोर्टाचे निर्देशानुसार दिव्यांगांसाठी दोन टक्के आरक्षण सोडले. ‘एम्स’च्या जाहिरातीनुसार ‘अ‍ॅनाटॉमी’, ‘फिजीओलॉजी’, ‘बायोकेमेस्ट्री’, ‘कम्युनिटी मेडिसीन’, ‘पॅथालॉजी’, ‘मायक्रोबॉयलॉजी’, ‘फार्मेकालॉजी’ व ‘फॉरेन्सिक’ विद्याशाखेसाठी आठ प्राध्यापक, चार अतिरिक्त प्राध्यापक, चार सहयोगी प्राध्यापक, १६ सहायक प्राध्यापक, १२ वरिष्ठ निवासी डॉक्टर तर आठ ट्युटर्स असे मिळून ५२ पदे निर्माण करण्यात आली होती. परंतु अनुसूचित जाती (एससी) अनुसुचित जमाती (एसटी) व इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाला घटनेने बहाल केलेल्या पदभरतीच्या आरक्षणापासून दूर ठेवले होते. याला घेऊन ‘लोकमत’ने ९ फेब्रुवारीच्या अंकात ‘एम्सच्या पदभरतीत आरक्षणाची पायमल्ली’ या मथळ्याखली वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने घेऊन जाहिरात मागे घेऊन नवीन जाहिरात तयार केली. यात नियमानुसार एससी, एसटी, व ओबीसींना आरक्षण देण्यात आले. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले असून ‘लोकमत’चे आभार मानले जात आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयscienceविज्ञान