नागपूर : जिल्हा विधिज्ञ संघटना(डीबीए)च्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती सुनील शुक्रे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे, ज्येष्ठ वकील ॲड. राजेंद्र पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष ॲड. कमल सतुजा यांनी प्रास्ताविक, ॲड. शबाना खान यांनी संचालन, ॲड. विनोद खोबरे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन तर ॲड. वैभव ओगले यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव ॲड. नितीन देशमुख, ॲड. सौरभ राऊत, ॲड. धर्मराज बोगाटी, ॲड. आशिष शेंडे, ॲड. रवी गवई, ॲड. सौरभ पोद्दार आदींनी परिश्रम घेतले.
डीबीएतर्फे संविधान दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:05 IST