शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

देशात हिंदूराष्ट्र निर्मितीचे षड्यंत्र

By admin | Updated: October 5, 2015 02:53 IST

भाजप हे संघाची कळसूत्री बाहुली आहे. त्यामुळे देशावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) विचारधारा थोपविण्यासाठी हिंदूराष्ट्र निर्मितीचे षड्यंत्र पुन्हा एकदा रचले जात आहे, ....

संघीकरण विरोधी परिषद : सीताराम येचुरी यांची टीका नागपूर : भाजप हे संघाची कळसूत्री बाहुली आहे. त्यामुळे देशावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) विचारधारा थोपविण्यासाठी हिंदूराष्ट्र निर्मितीचे षड्यंत्र पुन्हा एकदा रचले जात आहे, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय महासचिव खासदार सीताराम येचुरी यांनी येथे केली. रिपब्लिकन परिवारतर्फे रविवारी विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित ‘संघीकरणविरोधी परिषदे’चे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. येचुरी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला धर्मावर आधारित देशाची रचना पूर्वीपासूनच करायची आहे. त्या दिशेने त्यांचे काम सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली तेव्हा राजकारणात भाग घेणार नाही, या अटीवर बंदी मागे घेण्यात आली. तेव्हा आरएसएसने स्वतंत्र राजकीय संघटन उभे केले. यातून जनसंघाची स्थापना झाली. नंतर भाजपात त्याचे रूपांतर झाले. त्यामुळे भाजपा संघापासून वेगळा नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बोलावताच पंतप्रधानांपासून तर सर्व मंत्री धावून जातात. आरएसएस त्यांच्या कामकाजाचा आढावा घेते. सध्या भारतीय सैन्य, शिक्षण, भरती प्रक्रिया आदी सर्वांचे संघीकरण सुरू असल्याची टीका त्यांनी केली. डॉ. भाऊ लोखंडे यांनी आपल्या भाषणात आंबेडकरी चळवळीतील विभिषणांचा समाचार घेत भूतकाळात झालेल्या दगाफटक्यावरही प्रकाश टाकला. प्रा. रणजित मेश्राम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आरएसएस बलाढ्य नाही, तर त्यांनी तयार केलेली मनोरचना ही बलशाली आहे. हिंदू समाजातील अनेक लोकांनाही आरएसएसच्या षड्यंत्राची कल्पना आहे. तेव्हा दलित, आदिवासी, ओबीसींना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून द्या, असे आवाहन केले.निरंजन वासनिक यांनी भूमिका मांडली. प्रा. रत्नाकर मेश्राम यांनी प्रास्ताविक केले. छाया खोब्रागडे यांनी संचालन केले. प्रा. राहुल मून यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)