शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींच्या कामांना काँग्रेसवालेही नाकारणार नाही : शाहनवाज हुसैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:12 IST

नागपूर बदल रहा है, याची जाणीव आज मला नागपुरात आल्यानंतर झाली. पाच वर्षापूर्वीचे नागपूर आणि आताच्या नागपूरमध्ये कमालीचा बदल झाला आहे. हे केवळ नितीन गडकरी यांच्यामुळेच शक्य झाले आहे. निवडणुकींमध्ये त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार असले तरी, गडकरींच्या कामाला काँग्रेसवालेही नाकारणार नाही, अशी भावना भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते व माजी मंत्री शाहनवाज हुसैन यांनी केले.

ठळक मुद्देनागपूरच्या विकासावर व्यक्त केली भावना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर बदल रहा है, याची जाणीव आज मला नागपुरात आल्यानंतर झाली. पाच वर्षापूर्वीचे नागपूर आणि आताच्या नागपूरमध्ये कमालीचा बदल झाला आहे. हे केवळ नितीन गडकरी यांच्यामुळेच शक्य झाले आहे. निवडणुकींमध्ये त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार असले तरी, गडकरींच्या कामाला काँग्रेसवालेही नाकारणार नाही, अशी भावना भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते व माजी मंत्री शाहनवाज हुसैन यांनी केले.मोठा ताजबाग येथे नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, जमाल सिद्दीकी, अमीन पठाण, नागेश सहारे, लाला कुरेशी, रमेश सिंगारे, सतीश लोणारे, हैदर आलम आदी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, गडकरी हे विकासपुरुष आहे. संपूर्ण देशात त्यांनी केलेल्या कामाचा डंका आहे. मी स्वत: त्यांच्याकडून माझ्या क्षेत्रात पाच हजार कोटीचे काम करून घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा अग्रेसर होत आहे. पण नितीन गडकरीच्या कामामुळे पक्षाला बळ मिळत आहे. त्यांच्या कामाची कुठेही तुलना होऊ शकत नाही. त्यांनी काम करताना जातपात, पक्ष, धर्म कुठेही बाळगला नाही. त्यामुळे नागपूरकरांनी या विकास पुरुषाच्या पाठीशी राहिले पाहिजे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019