शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

सेवाकार्यात काँग्रेसजनही होतात सहभागी

By admin | Updated: February 9, 2015 01:00 IST

‘विहिंप’कडे (विश्व हिंदू परिषद) केवळ आक्रमक व आंदोलन करणारी संघटना म्हणून पाहण्यात येते. परंतु परिषदेकडून देशभरात मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य चालतात. अनेकदा पक्षभेद विसरून लोक

मधुकर दीक्षित : विहिंपतर्फे ‘सेवाकुंभ-२०१५’चे आयोजननागपूर : ‘विहिंप’कडे (विश्व हिंदू परिषद) केवळ आक्रमक व आंदोलन करणारी संघटना म्हणून पाहण्यात येते. परंतु परिषदेकडून देशभरात मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य चालतात. अनेकदा पक्षभेद विसरून लोक त्यात सहभागी होतात. केरळमध्ये तर कॉंग्रेस व डाव्या पक्षांचे लोकदेखील आमच्या कार्यात सहभागी झाल्याची उदाहरणे आहेत, असे प्रतिपादन ‘विहिंप’चे केंद्रीय मंत्री व अखिल भारतीय सहसेवाप्रमुख मधुकर दीक्षित यांनी केले. ‘विहिंप’च्या विदर्भ प्रांत सेवा विभागातर्फे सुवर्ण जयंतीनिमित्त विदर्भस्तरीय ‘सेवाकुंभ-२०१५’ चे आयोजन रविवारी रेशीमबाग परिसरातील महर्षी व्यास सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी ‘विहिंप’चे केंद्रीय मंत्री बाळकृष्ण नाईक, प्रशांत हरताळकर, उद्योजक रामरतन सारडा यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते १७ सेवाव्रतींचा सत्कार करण्यात आला. आज ‘विहिंप’तर्फे देशभरात ४४ अनाथाश्रम, ११२ छात्रावास, ३ महिलाश्रम, आरोग्यकेंद्र आदींद्वारे सेवाकार्य सुरू आहे. भारतात सेवाकायार्ची सुरुवात मिशनरींनी केली असा गैरसमज आहे. वास्तविक पाहता सेवा हा हिंदू जीवनपद्धतीचा एक अविभाज्य घटक आहे असे दीक्षित म्हणाले. सनतकुमार गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विदर्भ प्रांत उपाध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर, महिला विभागप्रमुख ममता चिंचवडकर, प्रांतमंत्री अजय निलदावार, अरुण नेटके उपस्थित होते.उदासा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी महिषासुरमर्दिनी स्तोत्र तर देवलापार आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. संचालन भारती धर्माधिकारी व रविकिरण चर्जन यांनी केले. आभार गणेश काळकर यांनी मानले. (प्रतिनिधी)राममंदिरासाठी कटिबद्धअयोध्येत रामाचे भव्य मंदिर उभारण्यात येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी भावना प्रशांत हरताळकर यांनी व्यक्त केली. मंदिर, श्रद्धा आणि संतांच्या रक्षणासाठी ‘विहिंप’ कटिबद्ध आहे. आजघडीला सात व्यक्तींमागे एक हिंदू असला तरी त्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे, असे ते म्हणाले.सेवाव्रतींचा विशेष सत्कारयावेळी चेतन उचितकर, संजय बंदेलवार, अर्चना डेहनकर, दुर्वांवती सरियाम, प्रज्ञा सोनटक्के, सावित्री बियाणी, दामोदरदास पारवानी, श्रीधर वैद्य, प्रफुल्ल पाडीया, रामरतन सारडा, अनिल मालवीय, प्रकाश छाबरिया, महेश झाडे, गोदावरी साठवणे, प्रभा सूर्यवंशी, राकेश कोरडीया, उर्मिला अग्रवाल या सेवाव्रतींचा विशेष सत्कार करण्यात आला.