शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

एसआरएच्या कार्यालयावर काँग्रेसची धडक

By admin | Updated: July 16, 2016 03:09 IST

मानकापूर परिसरातील गोदावरीनगर व गंगानगर येथील झोपडपट्टी महापालिकेतर्फे महिनाभरात तोडण्यात आली.

झोपडीधारकांचे आधी पुनर्वसन करा : झोपड्या तोडल्यास रस्त्यावर उतरू नागपूर : मानकापूर परिसरातील गोदावरीनगर व गंगानगर येथील झोपडपट्टी महापालिकेतर्फे महिनाभरात तोडण्यात आली. या झोपडपट्ट्या सन २००० पूर्वीच्या असतानाही येथील नागरिकांचे पुनर्वसन न करता तोडण्यात आल्या याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे शुक्रवारी एसआरए (झोपडपट्टी विकास प्राधिकरण)च्या कार्यालयावर धडक देण्यात आली. झोपडी तोडलेल्या नागरिकांना एसआरए अंतर्गत त्वरित घर द्यावे, अशी मागणी करीत यापुढे नियमित झालेल्या झोपडपट्ट्या तोडल्या तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. के.टी.नगर, काटोल रोड येथे एसआरएचे कार्यालय आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात पश्चिम नागपूर झोपडपट्टी सेलचे राम कळंबे यांनी शेकडो झोपडीधारकांना सोबत घेत या कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी जोरदार नारेबाजी करीत एसआरए सहायक आयुक्त रहाटे यांना घेराव घालण्यात आला. गोदावरीनगर व गंगानगर या सन २००० पूर्वी वसलेल्या झोपडपट्ट्या तोडण्यात आल्या. येथे नळ आहे. वीज आहे. नागरिक महापालिकेचा कर भरतात. त्यानंतरही झोपड्या कशा तोडण्यात आल्या, असा सवाल राम कळंबे यांनी केला. विकास ठाकरे म्हणाले, सन २००० पूर्वीच्या झोपडपट्ट्यांना कायद्यानुसार संरक्षण प्राप्त झाले आहे. संबंधित झोपड्या कोणत्याही परिस्थितीत हटवायच्या झाल्यास आधी संबंधितांची पर्यायी निवासव्यवस्था करणे बंधनकारक आहे. मात्र, या नागरिकांची पर्यायी व्यवस्था न करताच त्यांची घरे तोडण्यात आली आहेत. झोपडीधारकांवरचा हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. गेल्या २० वर्षांपासून हे नागरिक येथे वास्तव्यास आहेत. याच भागात यांचे रोजगार व व्यवसाय आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना उत्तर नागपुरातील एखाद्या कोपऱ्यात नेऊन बसविणे योग्य होणार नाही. त्यामुळे त्यांचे वास्तव्य असलेल्या भागातच एसआरए अंतर्गत गाळे बांधावे व या नागरिकांच्या निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली. यावर रहाटे यांनी झोपडपट्टी असलेल्या भागात सर्वेक्षण केले जाईल व जागा उपलब्ध असल्यास तेथे एसआरए अंतर्गत घर बांधून दिले जाईल, असे आश्वासन दिले. दीपक वानखेडे, सुनील चोपडा, हरीश ग्वालबंसी, नितीश ग्वालबंसी, घनशाम मांगे, रंजना मडावी, आसीफ अंसारी, बंटी शेळके, रिजवान शेख, सायरा, रंजना राऊत, जितु मस्के, दिलीप मामिक, मोहम्मद इस्माईल, विभल विदावत, आनंद तिवारी, धीरज पांडे, देवेंद्र कौरती, शालिक भांडारकर आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)