शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

काँग्रेसची नासुप्रवर धडक

By admin | Updated: August 11, 2016 02:10 IST

पूर्व नागपूर लगतच्या भागात नागरी सुविधांचा अभाव असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

पूर्व नागपूरच्या समस्या सोडवा: शुल्क घेऊनही विकासकामे नाही नागपूर : पूर्व नागपूर लगतच्या भागात नागरी सुविधांचा अभाव असल्याने नागरिक त्रस्त आहेत. यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्यानंतरही प्रशासन दखल घेत नाही. यामुळे बुधवारी काँग्रेसतर्फे नासुप्र कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसचे नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. महापालिकेतील विरोधी पक्षनेते विकास ठाक रे यांनी या आंदोलनात सहभागी होत नागरिकांच्या मूलभूत समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. पावसाळ्याला सुरुवात होताच पूर्व नागपुरात रस्त्यांची अवस्था बिकट होते. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसल्याने रस्त्यांवर व वस्त्यात पाणी साचते. या भागात सिवेज लाईन व पावसाळी नाल्या टाकण्याची गरज आहे. नागरिकांनी विकास शुल्क भरूनही विकास कामे झालेली नाहीत. दुसरीकडे नासुप्रने विकास शुल्कात भरमसाट वाढ केली आहे. यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी नासुप्रच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. नासुप्र सभापतींनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनाचे स्वरूप लक्षात घेता नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या तविरत लसोडविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. पूर्व नागपुरात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच नासुप्रने विकास शुल्क प्रति चौरस फूट १२३ आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याला पूर्व नागपुरातील नागरिकांचा विरोध असल्याचे नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांनी सांगितले. त्यानंतर एसएनडील कार्यालयावरही हा मोर्चा नेण्यात आला. मोर्चात विनोद चकोले, अरुण कुथे, गुलाबराव हारोडे, रूपेश माकडे, नितीन बांते, प्रदीप शेंडे, अंकुश भोवते, जवाहर पटले, मोहन वाघाये, विजय तोमर, अशोक पारधी, शेंद्रे मामा, बंडू शेंद्रे, गनी खान, रमेश भालेकर आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)