शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

उमेदवार शोधण्यासाठी काँग्रेसची धावाधाव

By admin | Updated: December 10, 2015 03:05 IST

काँग्रेसचे विद्यमान आ. राजेंद्र मुळक यांनी लढण्यास नकार दिल्याने काँग्रेस नेत्यांना उमेदवार शोधण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले.

भाजपकडून व्यास, काँग्रेसकडून चव्हाणनागपूर : काँग्रेसचे विद्यमान आ. राजेंद्र मुळक यांनी लढण्यास नकार दिल्याने काँग्रेस नेत्यांना उमेदवार शोधण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले. एकाही माजी मंत्री किंवा दिग्गज नेत्याने लढण्याची तयारी दर्शविली नाही. दोन दिवसाच्या नागपूर मुक्कामात प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनीही उमेदवारांची चाचपणी केली. प्रमोद मानमोडे, गिरीश पांडव यांनीही नकार दिला. बुधवारी सकाळी नगरसेवक संजय महाकाळकर यांचे नाव समोर आले. मात्र, शेवटी माजी खा. विलास मुत्तेमवार यांच्या घरी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. तीत माजी मंत्री नितीन राऊत, आ. सुनील केदार, अनंतराव घारड, नाना गावंडे, विकास ठाकरे उपस्थित होते. बैठकीत ‘सक्षम’ उमेदवार म्हणून अशोकसिंग चव्हाण यांचे नाव निश्चित करण्यात आले. विशेष म्हणजे रविभवनात आयोजित पहिल्या बैठकीत अशोकसिंग चव्हाण यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. चव्हाण हे शहर कार्यकारिणीचे सदस्य आहेत. १९९८ पासून ते काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत. सेवादलामध्येही त्यांनी काम केले आहे. दुपारी २.३० च्या सुमारास भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केले. भाजपचे गिरीश व्यास यांचा अर्ज दाखल करतेवेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, आशीष देशमुख, समीर मेघे, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, यांच्यासह या तिकीटावर दावा करणारे महापौर प्रवीण दटके, रमेश मानकर हे देखील उपस्थित होते. काँग्रेसचे उमेदवार अशोकसिंग चव्हाण यांच्यासोबत अर्ज दाखल करताना आ. सुनील केदार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, काँग्रेस नेते नाना गावंडे, प्रफुल्ल गुडधे यांच्यासह आ. राजेंद्र मुळक हे देखील उपस्थित होते. (प्रतिनिधी)