शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार विराेधात काँग्रेसची निदर्शने ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेसतर्फे संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेसतर्फे संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या धाेरणाविरुद्ध शहर काँग्रेसतर्फे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीमुळे नागरिकांचे कंबरडे माोडल्याने त्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी महागाईच्या विराेधात चुलीवर मसाले भात बनवून त्याचे वितरण करण्यात आले.

शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात शहरभरात केंद्र सरकार विरोधात आंदाेलन करण्यात आले. प्रदेश सचिव गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात सक्करदरा चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी महागाईच्या निषेधार्थ चुलीवर मसाले भात करून त्याचे वितरण करण्यात आले. महिला काँग्रेसतर्फे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व निर्मला सीतारामन यांचे मुखवटे लावून महागाईचा प्रतिकात्मक निषेध केला. नगरसेवक संजय महाकाळकर, मनोज गावंडे,गजराज हटेवार, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक, संगीता उपरीकर, ब्लॉक अध्यक्ष दिनेश तराळे, विश्वेश्वर अहिरकर, प्रवीण गवरे,माजी नगरसेवक वासुदेव ढोके, माजी नगरसेविका नैना झाडे,प्रवीण सांदेकर आशिष ढोक, राजू भोंडे,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव अक्षय हेटे,रौनक चौधरी, चक्रधर भोयर,नीलेश खोरगडे, कार्याध्यक्ष सुशांत लोखंडे, एन एस यु आ. चे प्रदेश सचिव प्रतीक कोल्हे, अध्यक्ष प्रणय ठाकूर, वीणाताई बेलगे,शुभम तल्हार,छोटा अमजद भाई, डॉ. मनोहर तांबूलकर, सेवादलचे गोविंदराव खोब्रागडे, डेहनकर गुरुजी, भगवतकर, नासरे, महेश बांते,भुजंगराव ठाकरे उपस्थित होते.

त्याचप्रकारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषी कायद्याविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत धवड, अल्पसंख्यक सेलचे शहराध्यक्ष इरशाद अली, ओबीसी कांग्रेसचे अध्यक्ष पंकज निघोट, महेश श्रीवास, अब्दुल शकील, आकाश तायवाड़े उपस्थित हाेते. मध्य नागपुरात ब्लॉक अध्यक्ष मोतीराम मोहाडीकर यांच्या नेतृत्वात मास्क वितरित करण्यात आले. अण्णाजी राऊत, गीता जळगांवकर, अनिल केसरवानी, प्रवीण कामडे, राहुल खापेकर, अविनाश बन्सोड, अफजल शाह उपस्थित होते.

उत्तर नागपुरात प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात अन्न-धान्य किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय सेवा दल संघटक कृष्णकुमार पांडे, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रत्नाकर जयपूरकर, उत्तर नागपूर महिला काँग्रेस अध्यक्ष विजया हजारे, रेखा लांजेवार, कल्पना द्रोणकर, उपस्थित होते.