शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

काँग्रेस-राष्ट्रवादी संपली

By admin | Updated: January 16, 2017 01:58 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस संपली आहे आणि नोटाबंदीनंतर भाजपही मागे पडणार आहे, अशी जाहीर टीका बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड

विलास गरुड : नोटाबंदीचा भाजपलाही फटका, बसपा राहील पहिल्या क्रमांकावर नागपूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस संपली आहे आणि नोटाबंदीनंतर भाजपही मागे पडणार आहे, अशी जाहीर टीका बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी येथे केली. आगामी महापालिका निवडणुकीत बसपा हाच पहिल्या क्रमांकावर राहील, असा दावाही त्यांनी यावेळी केला. चंद्रमणीनगर चौक येथे बसपाच्या वतीने आयोजित सभेत ते बोलत होते. बसपातर्फे हा दिवस जनकल्याण योजना दिन म्हणून पाळण्यात आला. यावेळी बसपाचे महाराष्ट्र प्रभारी गौरीप्रसाद उपासक प्रमुख अतिथी होते. यावेळी गरजूंना साहित्य व आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. विलास गरुड म्हणाले, मायावती यांनी संघर्षातून आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. तेव्हा त्यांच्या संघर्षापासून प्रेरणा घ्या. कांशीराम यांनी त्यांना जी जबाबदारी सोपविली ती त्यांनी पार पाडली. आज त्या पक्षाच्या प्रमुख पदावर विराजमान आहेत. ही गोष्ट बसपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने लक्षात घ्यावी. नागपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक २५ वर्षांपासून रखडत ठेवले हा बाबासाहेबांचा अपमान असून या अपमानाचा बदला घ्या आणि आगामी महापालिकेमध्ये बसपाचाच महापौर बनवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. गौरीप्रसाद उपासक यांनी यावेळी उत्तर प्रदेशात बसपाची सत्ता येईल आणि मायावती या पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा दावा केला. यावेळी बसपाचे उपाध्यक्ष कृष्णा बेले, प्रभारी प्रेम रोडेकर, महासचिव जितेंद्र्र म्हैसकर, प्रदेश सचिव सागर डबरासे, उत्तम शेवडे, रमेश लोखंडे, किशोर कैथेल, डॉ.राजेंद्र पडोळे, मंडल कॉर्डिनेटर रूपेश बागेश्वर, पृथ्वीराज शेंडे, जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, विवेक हाडके, नगरसेवक गौतम पाटील, सत्यभामा लोखंडे, अजय डांगे, आदिवासी नेते प्रभु कालसर्पे हर्षला जैस्वाल, नरेश वासनिक, नवनीत धडाडे, आनंद सोमकुंवर, रोहित वालदे, योगेश लांजेवार, प्रफुल मानके, अभिषेक शंभरकर, मो. जमाल, संजय सोमकुंवर, हर्षवर्धन डोइफोड़े पंकज ताकसांडे, जितेन्द्र घोडेस्वार, सदानंद जामगडे, कपिल राऊत, मनोज रहाटे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)